संन्यासी साधू करतात दिवसातून तीन वेळा स्नान; जाणून घ्या तीनवेळा स्नान करण्याचा लाभ..

प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही स्नान (अंघोळ) केल्याशिवाय होतच नाही. सकाळी आपले शरीर स्वच्छ करण्यासाठी स्नान केले जाते.

संन्यासी साधू करतात दिवसातून तीन वेळा स्नान; जाणून घ्या तीनवेळा स्नान करण्याचा लाभ..

प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही स्नान (अंघोळ) केल्याशिवाय होतच नाही. सकाळी आपले शरीर स्वच्छ करण्यासाठी स्नान केले जाते. शास्त्रात देखील म्हंटले आहे की स्नान केल्याशिवाय म्हणजेच शरीर स्वच्छ केल्याशिवाय कोणतेच कर्म करू नये. स्नान केल्याने आपल्याला प्रसन्न वाटून आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते. स्नान करण्याचे फायदे देखील अनेक आहेत. धार्मिक मान्यतेनुसार सन्यास तसेच वैराग्य प्राप्त झालेल्या मनुष्याने त्रिकाल म्हणजेच दिवसाचे तीन प्रहर स्नान करण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालत आली आहे. पहिले स्नान सकाळी सूर्योदयापूर्वी तर संध्याकाळचे स्नान सूर्यास्तानंतर करायची योग्यपद्धत आहे. स्नान करण्याची देखील योग्य पद्धत आहे. स्नान करताना दक्षिणेकडे कधीच तोंड करू नये. सकाळी म्हणजेच सूर्योदयापूर्वी आपण पहिले स्नान करतो या स्नानाला प्रातःस्नान असे म्हंटले जाते. प्रातःस्नान करताना आपले मुख पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे. संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर करण्यात येणाऱ्या स्नानाला सायंस्नान असे म्हंटले जाते. त्याचबरोबर सूर्यास्तानंतर स्नान करताना आपले मुख हे पश्चिम दिशेला अथवा उत्तर दिशेला असले पाहिजे.

शास्त्रानुसार प्रातःस्नानानंतर सूर्यकिरण अंगावर घेण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार आपले मन आनंददायी होऊन आपली बुद्धी आपोआप तल्लख होते. स्नानाची योग्य पद्धतीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, त्याचबरोबर आपल्याला नीट बोलता देखील येते. बहुतांशजण स्नान कडकडीत गरम पाण्याने करतात अथवा फार थंड पाण्याने मात्र ही पद्धत चुकीची आहे. स्नान करताना नेहमी कोमट पाणी अंगावर घ्यावे. स्नान करत असताना पवित्र नद्यांचा नावाने जप करावा. भारतीय संस्कृतीमध्ये स्मरण करण्याचे प्रचंड महत्व आहे.

स्नान करताना मनात देवाचे नामस्मरण करावे. डोक्यावरून पाणी घेताना कधीही तोंडाने देवाच्या नावाचा उच्चार करू नये तसे केल्याने देवाचे रूप स्नान कर्त्याला प्राप्त होईल असे म्हंटले जाते. आणि म्हणूनच स्नान करताना पवित्र नद्यांची नावे घेण्याची परंपरा सुरु झाली आहे. सकाळचे स्नान म्हणजेच प्रातःस्नान सूर्योदयापूर्वी करणे आवश्यक आहे. या परंपरेचे अनेक फायदे आहेत म्हणूनच पूर्वीपासून ही परंपरा चालत आली आहे. या परंपरेत कधीही खंड पडत कामा नये. तसेच पहाटेची वेळ हि महत्वाची मानली जाते त्याचेकारण म्हणजे ही वेळ ब्रम्हमुहूर्ताची मानली जाते. प्रातःस्नानाचे महत्व हे भरपूर आहे.

स्नान केल्यामुळे आपले बाहेरील शरीर स्वच्छ होते तसेच आपल्या अंगावरील घाण निघून जाते. स्नान करताना नेहमी साबणाचा वापर करावा त्याने आपले अंगावरील जंतू मारून जातात. स्नान करताना नेहमी कोमट पाणी घ्यावे. थंड पाणी कोमट करताना नेहमी त्यावर झाकण ठेवावे असे केल्याने पाणी शुद्ध राहते. नदीवर स्नान करताना नेहमी तुमचे मुख हे नदीच्या प्रवाहाच्या दिशेने असले पाहिजे. स्नान करताना कोणतेही देवाचे पवित्र मंत्र म्हणू नये. प्राचीन काळी जेव्हा पाणी मिळते नसे तेव्हा सूर्यस्नान, भस्मस्नान, पावनस्नान अशा काही प्रकारांनी स्नान केले जात असे. प्रत्येकाने दिवसातून दोनदा तरी स्नान केले पाहिजे. आपल्या आरोग्याच्या निगडित अनेक समस्या देखील दूर होतात.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

World Ocean Day 2023: या कारणांमुळे जागतिक महासागर दिन साजरा केला जातो

Biporjoy वादळाचा वाढता धोका! पुढील २४ तासांत दिसू शकते रौद्र रूप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version