सध्या डोळ्यांची साथ पसरत चालली आहे, तर अशी घ्या डोळ्यांची काळजी

सध्या डोळ्यांची साथ पसरत चालली आहे, तर अशी घ्या डोळ्यांची काळजी

सध्या डोळ्यांची साथ खूप पसरताना दिसत आहे. तसेच डोळे खूप नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात त्यांची अजून काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आहार आपला चांगला असावा. व्हिटॅमिन आणि फायबर युक्त पदार्थ खाणे. जसे की अंडी, पपई , हिरव्या पालेभाज्या, फळ हे सेवन करणे. बदलती जीवनशैली आणि दीर्घकाळ स्क्रीनकडे बघितल्याने आजच्या तरुणपिढीमध्ये डोळ्यांचे त्रास व डोळ्यात जळजळ होण्याची समस्या निर्माण होत आहे. तर आज आम्ही तुम्हाला डोळ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे ते आज सांगणार आहोत.

हे ही वाचा : भारतात पर्यटनासाठी ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या

 

वाढत्या वयासोबत डोळ्यांमध्ये बदल येऊ शकतो. डोळ्यांना त्रास होऊ शकतो. आजकालची पिढी कॉम्प्युटर लॅपटॉप खूप वापरताना खूप दिसत आहे. त्यामुळे डोळ्यांना खाज येणे , डोळे लाल होणे , जळजळ होणे, असे लक्षणे दिसून येतात. त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

डोळ्यांची घ्या अशी काळजी –

रोज पाण्याने डोळे स्वच्छ धुवा.

डोळ्यांना गरम पाण्याची वाफ द्या.

घराबाहेर पडताना सॅनग्लास वापरावेत.

डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी रोज चप्पल न घालता सकाळी सकाळी गवतावर चालावे.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजराचा ज्युस पिणे, तसेच गाजर खाणे खूप उपयुक्त आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजरातील कॅरोटीन खूप उपयुक्त ठरते. जे डोळ्यांच्या स्नायूंना मजबूत करते. जर तुम्हाला डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असतील तर तुम्ही गाजराच्या रसाचे सेवन करू शकता.

रोज नियमितपणे डोळ्यांचे व्यायाम करावेत.

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बदाम , अंजीर , किशमिश रात्री भिजत ठेवून, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खाऊ शकता. कारण सुक्या मेव्यात फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

डोळ्यांचा जर तुम्हाला काही आजार झाला असेल किंवा त्याचे लक्षणे दिसून येत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर औषध उपचार चालू करा.

हे ही वाचा :

तुम्ही हिल स्टेशनला जाण्याचा विचार करताय ? तर ‘या’ वस्तू नक्की तुमच्या सोबत ठेवा

 

Exit mobile version