मैद्याचे पदार्थ खाणे टाळा, शरीराला होतील ‘हे’ फायदे

मैदा बनविताना त्यातील फायबर आणि अन्य पौष्टिक तत्व निघून जाते. त्यामुळे मैदा शरीरासाठी घातक असतो. आपण रोज मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करतो.

मैद्याचे पदार्थ खाणे टाळा, शरीराला होतील ‘हे’ फायदे

मैदा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. मैदा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहे. मैदा रसायनांचा वापर करून आणि त्यावर अनेक प्रक्रिया करून गव्हापासून तयार करण्यात येतो. मैदा बनविताना त्यातील फायबर आणि अन्य पौष्टिक तत्व निघून जाते. त्यामुळे मैदा शरीरासाठी घातक असतो. आपण रोज मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करतो. त्यामध्ये ब्रेड, बिस्किट, पेस्ट्री, पिझ्झा यासांरख्या अनेक पदार्थांचा समावेश असतो. मैदा तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत त्यातील फायबर निघून जाते. त्यामुळे मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

तसेच अनेक आजार टाळण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी काही काळ मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांपासून दूर राहणे योग्य ठरते. मैदा खाणे कमी केल्याने त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. मैदा खाल्यामुळे अनेकांना पचनशक्तीसंबंधित तक्रारी अनुभवता येतील. मैदा खाल्ल्यामुळे अपचन होण्याची समस्या सर्रास पाहायला मिळतात. त्यामुळे मैदा खाणे कमी केल्यास शरीरासाठी लाभदायक ठरू शकते. मैद्याऐवजी गव्हाचे पाठी, बदामाचे पीठ, बाजरी, नाचणीचे पीठ वापरणे अतिशय फायदेमंद ठरू शकते.

तसेच मैद्याचे पदार्थ टाळल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खाली येते. तसेच मैद्याचे सेवन अति प्रमाणात केल्यास ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मैद्याचे सेवन टाळल्यामुळे डायबिटीसचा त्रास होत नाही. तसेच मैद्यामध्ये कॅलरी जास्त प्रमाणात आढळतात. ज्यामुळे लवकर वजन वाढू शकते. मैदा खाणे कमी किंवा बंद केल्यास वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल मैद्याचे पदार्थ टाळणेच योग्य ठरेल.

त्यासोबतच मैद्याचे पदार्थ खाणे टाळल्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल चांगली राहाते आणि काम करण्यासाठी अधिक उत्साह टिकून राहातो. मैद्यामुळे शरीरातील पेशी सुजतात. ज्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाणे कमी केल्यामुळे अनेक आजार टाळण्यासाठी मदत होते.

हे ही वाचा:

World Photography Day 2023, तुम्हाला माहिती का ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ साजरा करण्यामागचं कारण?

चपातीचे चटपटीत चाट कसे करावे…जाणून घ्या रेसिपी

कडीपत्त्याच्या स्पेशल चटणीसाठी जाणून घ्या सोपी रेसिपी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version