किडणी खराब होऊ नये म्हणून हे पदार्थ खाणे टाळा

किडणी खराब होऊ नये म्हणून हे पदार्थ खाणे टाळा

किडणी खराब होण्याची अनेक लक्षणे आहेत. उच्चरक्तदाबामुळे किडणी खराब होऊ शकते. किडणी खराब झाल्यास आपले अर्धे आयुष्य संपते. किडणीमुळे आपले रक्त स्वच्छ होते. शरीरातील विषारी अन्न बाहेर टाकते. मात्र मधुमेहाच्या आजाराने किडनी खराब होऊ शकते. किडनीचे नुकसान टाळण्यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे.

हे ही वाचा : लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर आणि आजारांवर ‘हा’ रामबाण उपाय

 

रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात वाढल्यास मूत्रपिंड खराब होते. किडनीमध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांचा समूह खराब होतो. जेव्हा रक्तवाहिन्या कमकुवत होऊ लागतात, तेव्हा मूत्रपिंड योग्यकरिता काम करत नाही यामुळे सतत लघवी होणे. उच्चरक्तदाब होण्याची समस्या उद्भवते. आणि आपली किडणी खराब होऊ लागते.

किडणी खराब होऊ नये म्हणून रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवा. त्यामुळे तुमचे किडनीचे नुकसान होऊ शकत नाही.

खाण्यापिण्याची काळजी घेणे. योग्य आहार घेणे आणि वेळेवर जेवणे.

ताण तणाव पासून दूर राहा.

नियमित व्यायाम करणे आणि रोज योगासने करा.

उच्चरक्तदाब झाल्यास आरोग्याची काळजी घ्यावी.

 

तुमच्या पोटातात जास्तप्रमाणत वेदना होत असेल तर सोनोग्राफी करून घेणे.

जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये.

जास्त पोटॅशियम असलेल्या भाज्या जास्त प्रमाणात खाऊ नये. (बटाटा , संत्री , टोमॅटो इत्यादी).

जास्त प्रमाणात दूध, दही ,चीज खाऊ नये यामुळे तुमचे वजन देखील वाढू शकते.

बाहेरील पदार्थाचे सेवन कमी करणे. तेलकट , तिखट कमी खाणे.

लोणची, मासे जास्त प्रमाणात खाऊ नये.

किडणी खराब होण्याची लक्षणे –

शरीरात सूज येणे.

जास्त प्रमाणात चक्कर आणि अशक्तपणा येणे.

पाठीत जास्त वेदना होणे.

त्वचेवर खाज येणे. आणि त्वचा लाला होणे.

मूत्रपिंडाच्या समस्येमुळे उलट्या होणे,जुलाब होणे , गॅस होणे असे लक्षणे दिसून येतात.

जास्त थंडी वाजणे. डोकेदुखी होणे. हात पाय दुखणे.

किडणी फेल झाल्यास सतत लघवी होणे.

हे ही वाचा :

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना फसवणूक होते?, ग्राहकांनी अशी घ्या काळजी

 

Exit mobile version