तुम्हाला प्रवासात गाडी लागते ? करा ‘हे’ उपाय

त्यामुळे गाडी लागण्याच्या त्रासाने अनेक जण लांबचा प्रवास करण्यास घाबरतात. तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी उपयोगाच्या ठरतील.

तुम्हाला प्रवासात गाडी लागते ? करा ‘हे’ उपाय

आपल्यातील अनेकांना प्रवासादरम्यान मळमळल्या सारखे होते. त्यामुळे अनेक जण लांबचा प्रवास करण्याचं टाळतात. प्रवासात असा त्रास होऊन बरेच जण हैराण होतात. त्यामुळे गाडी लागण्याच्या त्रासाने अनेक जण लांबचा प्रवास करण्यास घाबरतात. तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी उपयोगाच्या ठरतील.

१. लिंबू

जर तुम्ही प्रवासात सारख्या होणाऱ्या उलटीमुळे हैराण झाले असाल तर, तुम्ही प्रवासात तुमच्या सोबत लिंबू नक्की ठेवा. लिंबामुळे तुम्हाला उलटी किंवा मळमळण्याचा त्रास होणार नाही. तसेच प्रवासादरम्यान तुमच्यासोबत गरम पाणीसुद्धा ठेवा, जेव्हा तुम्हाला मळमळण्याचा त्रास होईल, तेव्हा गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ मिसळून प्या. या उपायामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

२. आलं 

आल्यामध्ये असे काही घटक आहेत, ज्याने तुम्हाला मळमळण्याचा त्रास अजिबात होणार नाही. आलं तुमच्या पोटातील जळजळ लगेच कमी करतो. त्यामुळे प्रवासा दरम्यान आल्याचा चहा, आल्याचा काढा घेत रहावा जेणेकरून उलटीचा त्रास होणार नाही, त्याचबरोबर आल्याचा एखादा तुकडा न विसरता तुमच्या सोबत ठेवत जा.

३.पुदिना 

प्रवासात पुदिना तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरू शकतो. पुदिन्यामुळे पोटामध्ये गारवा तयार होतो. त्यामुळे तुम्हाला प्रवासात रिफ्रेश झाल्यासारखे वाटत राहते. किंवा तुम्ही पुदिन्याची गोळी किंवा पुदिना सरबत पिऊ शकता.

४. आवळा 

आवळा चवीला तुरट असला तरी त्याने तुम्हाला प्रवासात खूप फायदा होईल. तुम्हाला मळमळण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता. शिवाय तुम्ही बाहेर फिरताना आवळा कॅन्डी किंवा आवळ्याचा रस पिऊ शकता.

५. केळी 

A bunch of bananas. Clipping path included.

केळ्यामुळे पोटॅशियम रिस्टोर होण्यास मदत होते, याशिवाय केळी खाल्ल्याने बऱ्यापैकी उलटीचा त्रास कमी होतो. त्यामुळे तुम्ही जर लांबच्या प्रवासासाठी जात असाल तर तुम्ही तुमच्यासोबत केळी ठेवा. केली न चुकता सोबत ठेवा त्याने तुम्हाला नक्की बरं वाटेल.

वरील सर्व उपाय करून पहा नक्की आराम मिळेल. (फोटो क्रेडिट – गुगल)

Exit mobile version