लवंग खाणं टाळताय? मग जाणून घ्या लवंगीचे आहारात समावेश करण्याचे फायदे

लवंग खाणं टाळताय? मग जाणून घ्या लवंगीचे आहारात समावेश करण्याचे फायदे

भारतात सर्वात जास्त मसाल्यांच्या पदार्थांचा वापर केला जातो. यामध्येच लवंगांचा (Cloves) समावेश देखील होतो. तर भारतातच नव्हे तर इंडोनेशियामध्ये देखील वर्षानुवर्षे पोटाच्या समस्यांवर औषध म्हणून लवंगाचा (Cloves) वापर केला जातो. लवंगाचे (Cloves) अनेक फायदे आहेत. तसेच लवंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. जसे की लवंगांमध्ये असलेलय अँटी-बॅक्टेरिअल, अँटीव्हायरल, अँटी-पॅरॅसेटिक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे लवंग ही अनेक चिनी औषधांमध्ये आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी वापरली जाते. तसेच भारतामध्ये दात दुखीसाठी आणि केसांसाठी देखील लवंगांचा वापर केला जातो. अशेच लवंगांचे अनेक फायदे आहेत. आता आम्ही तुम्हाला लवंगाच्या विविध फायद्यांसंदर्भात सांगणार आहोत.

पचनास मदत : लवंग हे पचनासाठी देखील फायदेशीर आहे. अन्नाचे शरीरात विघटन होण्यासाठी योग्य पचन क्रिया होणे आवश्यक आहे. लवंग (Cloves) पचन क्रिया सुधारण्यासाठी मदत करत.

केसची वाढ : लवंगांमध्ये (Cloves) अशे काही घटक असतात , जे पेशींची वाढ होण्यास मदत करतात. त्याशिवाय लवंगांमध्ये व्हिटॅमिन केचा समावेश असतो जो रक्ताभिसरणाला चालना देते. ज्यामुळे केसांची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते.

केसांची मजबूती : केस नीट न विंचरणे, केस गळणे , केस तुटणे अशा समस्यांना ज्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी लवंग फायदेशीर आहे. मुख्य म्हणजे लवंग हे तुमचे केस तुटणे टाळू शकते. लवंगामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स नावाचा घटक असतो जे आपले केस मजबूत करतात, आणि केसांचे संरक्षण करतात.

हे ही वाचा:

पुढची सुनावणी ३० जानेवारीला 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याला तारे-तारकांचा मेळा, शाहरुख-सलमानसह या स्टार्सनी लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version