आतड्यांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक गुणधर्म

जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटीऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात.

आतड्यांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक गुणधर्म

आतड्यांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. तुमचे आतडे काही कारणास्तवत अस्वास्थ्यकर झाले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि हार्मोन्स देखील प्रभावित होतील,आणि तुम्ही आजारी पडाल. पण जेव्हा पचनक्रिया बिघडते तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या आजारास सामोरे जावे लागते. आणि गॅस,ऍसिडिटी,अशक्तपणा, यासारखी लक्षणे दिसून येतात. तुम्हाला आतड्याचे आजार दूर करायचे असतील तर तुम्ही दैनंदिन जीवनात घरगुती आरोग्याचा समावेश करू शकता.

जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटीऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात. जिरं आपल्या प्रतिकारशक्तीलाही वाढवतं. त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. जिऱ्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगले पचते. आवळ्यासोबत जिरं, ओवा आणि काळं मीठ मिसळून खाल्ल्यास भूक वाढते. पचनासाठी ओवा फायदेशीर असल्यामुळे ओव्याचे अनेक फायदे शरीरावर होतात.तसेच जिरे वजन कमी करण्यास मदत करते.

तुम्हाला पोटात जळजळ होणे किंवा ऍसिडिटी होणे यासारखे जर लक्षणे जर आढळून आल्यास तुम्ही आवळ्याच्या चूर्णाचे सेवन करू शकता. किंवा आवळ्याचा रस ही पिऊ शकता. आवळ्यामधे भरपूर प्रमाणात फायबर असते. म्हणून आवळ्याचा रस पिल्यास किंवा आवळ्याच्या चूर्णाचे सेवन केल्यास तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.

तुम्हाला बद्धकोष्ठतचा त्रास असल्यास रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळाचे चूर्ण कोमट पाण्यात घालून पिऊ शकता. त्रिफळा हे एक आयुर्वेदिक औषध आहे जे पचनक्रिया सुधारते. त्रिफळा निरोगी आरोग्य आणि रोगप्रतिकार कार्यामध्ये योगदान देते. त्रिफळ चूर्ण केवळ पचनशक्ती नाही तर पोटातील आतड्यांशी संबधीत समस्याही दूर करते आणि पोटही साफ करते. त्रिफळाच्या चूर्णाचे सेवन केल्यास आपल्याला चांगली झोप लागते. त्याच प्रमाणे आहारामध्ये बदल केल्यास तुमच्या आतड्यातील आजार दूर होण्यास मदत होऊ शकते.

हे ही वाचा:

पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर

राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाले आहे, बकिंगहॅम पॅलेसने घोषणा केली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version