भारतात पर्यटनासाठी ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या

तुम्ही सुट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय का? तर तुम्हाला कुठे जायचे हा प्रश्न नक्की तुम्हाला पडत असेल? तसेच भारतात फिरण्यासारखे बरेच ठिकाण आहे. सुट्यांमध्ये बाहेर फिरायला गेल्यास तुम्हाला थोडे चेंज झाल्यासारखे वाटे. कारण आपण ऑफिसच्या कामामुळे खूप कंटाळे असतो. रोज रोज तेच काम करणे या गोष्टीला आपण कंटाळतो. आपल्याला आयुष्यात काहीतरी वेगळे झाल्यास आनंद मिळतो. आणि आपल्याला ताजेतवाने चांगले फ्रेश वाटे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.

हे ही वाचा : पोटा मधील सूज कमी करण्यासाठी या टिप्स फोल्लो करा

 

लडाख (Ladakh) –

 

जर तुम्ही अजून लडाखला गेलात नसाल तर नक्की जाऊन एकदा त्या ठिकाणी भेट द्या. लडाख या ठिकाणी भेट देण्यासाठी देश – विदेशातून लोक येतात. लडाख मध्ये अनेक प्रकारचे प्रेक्षणीय स्थळे आहेत. लडाखच्या पॅंगॉन्ग लेक आणि लेह पॅलेसला भेट द्यायची प्रत्येकाची इच्छा असते. येथील स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि तिबेटी संस्कृती पर्यटकांचे लक्ष वेधून टाकते.

नैनिताल (Nainital) –

उत्तराखंडामध्ये असलेले नैनिताल (Nainital) पर्यटकाना खूप आवडते. नैनिताल मधील तलावात बोटिंग करायला सर्वांना आवडते. नैनितालची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १९३८ मीटर आहे. नैनिताल मध्ये भरपूर सुंदर आणि लक्ष वेधून टाकणारी पर्यटन स्थळे आहेत. सुट्यांमध्ये तुम्ही नक्की नैनिताल या हिल स्टेशनला भेट द्या.

उटी (Ooty) –

दक्षिण भारतातील तमिळनाडूमध्ये प्रसिद्द असलेले हिल स्टेशन म्हणजे उटी. उटी या देशाला हिल स्टेशनची राणी देखील म्हंटले जाते. उटी हे निलगिरी मध्ये वसलेला देश आहे. उटीचे तलाव, धबधबा, निलगिरीचे तेल यासाठी उटी हिल स्टेशन खूप प्रसिद्द आहे. उटी या ठिकाणी भेट देण्यासाठी लाखो पर्यटक येतात.

 

मनाली (Manali) –

मनाली हे हिल स्टेशन भारतात खूप प्रसिद्द आहे. तसेच मनाली ट्रेकिंग, खरेदी, पॅराग्लायडिंग, पक्षी निरीक्षण, नदी राफ्टिंग या साठी देखील खूप प्रसिद्द आहे. मनाली या हिल स्टेशनला अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येतात. जर तुम्हाला मनाली मध्ये फिरायला जायचे असेल तर तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारी या मध्ये तुम्ही जाऊ शकता.

दार्जिलिंग (Darjeeling) –

दार्जिलिंग पश्चिम बंगाल मधील प्रसिद्ध ठिकाण आहे. हिवाळ्यातील सुट्ट्यांसाठी दार्जिलिंग खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. दार्जिलिंग मधील दार्जिलिंग टॉय ट्रेन, सेंचल तलाव, महाकाल मंदिर, टायगर हिल, धीरधाम मंदिर, वेधशाळा टेकडी हे प्रमुख ठिकाण आहे. तसेच दार्जिलिंग नदी राफ्टिंग, ट्रेकिंग, टॉय ट्रेन राइड साठी खूप प्रसिद्द आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत आकर्षित करणाऱ्या चॉकलेट फटक्यांपासून दूर रहा

 

Exit mobile version