spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जन्माष्टमीपूर्वी सोने-चांदीला आली स्वस्ताई, दरवाढीने घेतली क्षणभर विश्रांती…

सण उत्सवाचे दिवस जवळ आले असतानाच जन्माष्टमीपूर्वीच सोने आणि चांदीच्या भावाने थोडी विश्रांती घेतली आहे. मौल्यवान धातूंच्या दरवाढीला या आठवड्यात थोडा लगाम लागला आहे.

सण उत्सवाचे दिवस जवळ आले असतानाच जन्माष्टमीपूर्वीच सोने आणि चांदीच्या भावाने थोडी विश्रांती घेतली आहे. मौल्यवान धातूंच्या दरवाढीला या आठवड्यात थोडा लगाम लागला आहे. या आठवड्यात  सोन्याच्या भावात अचानक ५५० रुपयांनी वाढ झाली असून तर त्यात ६७० रुपयांची घसरण झाली आहे. चांदी एकदाच हजार रुपयांनी वधारली  तर ती आता ३०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. या आठवड्याच्या दरवाढीला अखेर तात्पुरता लगाम लागल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आनंदवार्ता मिळाली आहे. या आठवड्यात सोने एकदाच ५५० रुपयांनी वधारले तर त्यात चक्क ६७० रुपयांची स्वस्ताई आली आहे. २२ ऑगस्टला ३८० रुपयांची तर २३ ऑगस्ट रोजी १७० रुपयांची घसरण झाली. २४ ऑगस्टला किंमतीत काहीच बदल झाला नाही. आता २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,७५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २० ऑगस्ट रोजी चांदी १ हजार रुपयांनी वधारली होती. २१ आणि २२ ऑगस्ट रोजी चांदीत कोणताच बदल झाला नाही. २३ ऑगस्ट रोजी चांदी ३०० रुपयांनी स्वस्त झाली. एक किलो चांदीचा भाव ८६,७०० रुपये आहे.

कालच्या किंमती २४ कॅरेट सोने ७१,४२४ तर २३ कॅरेट ७१,१३८ आणि २२ कॅरेट सोने ६५,४२४ रुपयांवर घसरलेले आहेत. एक किलो चांदीचा भाव ८४,६१५ रुपये इतका झाला आहे. सराफ बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. शहरानुसार किंमतीत बदल दिसून येऊ शकतो. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या आणि शनिवार व रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. तसेच ग्राहक (८९५५६६४४३३) या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकता.

हे ही वाचा:

“इथे बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत”; Uddhav Thackeray यांनी विरोधकांना काढला चिमटा

“ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तीच या महाराष्ट्रात झालीय”; Raj Thackeray यांचे भाष्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss