Weigt loss साठी फायदेशीर तूप -रोटी, विश्वास नाही ना बसत , तर मग नक्की वाचा

आपल्या घरात अनेक वर्षांपासून तुपाशिवाय (Ghee) कोणताही पदार्थ केला जात नाही. भात,डाळ,वरण,भाजी,गोड पदार्थ आणि मुखतः पोळी (Roti) यांवर तूप टाकल्याशिवाय हे पदार्थ खाल्ले जात नाही.तव्यावरून पानात वाढलेली गरमागरम पोळी आणि तूप खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

Weigt loss साठी फायदेशीर तूप -रोटी, विश्वास नाही ना बसत , तर मग नक्की वाचा
आपल्या घरात अनेक वर्षांपासून तुपाशिवाय (Ghee) कोणताही पदार्थ केला जात नाही. भात,डाळ,वरण,भाजी,गोड पदार्थ आणि मुख्यतः पोळी (Roti) यांवर तूप टाकल्याशिवाय हे पदार्थ खाल्ले जात नाही.तव्यावरून पानात वाढलेली गरमागरम पोळी आणि तूप खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तुपाच्या नुसत्या सुगंधाने माणसाची भूक चालवली जाते आणि अन्नाची चवदेखील वाढते. पण आजकाल आपण पाहत आहोत की बऱ्याच घरांमध्ये तुपाचा वापर हा कमी केला जातो. पराठ्यांवरसुद्धा आता आपण पाहतो की तुपाऐवजी ऑलिव्ह ऑइल लावले जाते. पण हेल्थ आणि फिटनेससाठी ते खूप घातक असते.पोळीवर तूप लावून खाल्ल्याने एनर्जी आणि जबरदस्त ताकद मिळते.

तूप पोळी खाण्याचे सर्व फायदे तुम्हाला माहित आहेत का?

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तूप एका ठराविक प्रमाणात खाल्ले तर ते खूप फायदेशीर ठरते. वजन कमी करणारे अनेक लोक त्यांच्या आहारातून तूप हा पदार्थ काढून टाकतात, पण ते अयोग्य आहे. उलट वजन घटवण्यासाठी तुपाची खूप मदत होते,असे म्हटले जाते. तूप हे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी करण्याचे काम करते. GI इंडेक्स हे कार्बोहायड्रेट-समृद्ध (carbohydrate) अन्नाचे रेटिंग असते. जे आपण खात असलेल्या अन्नाचा ग्लुकोजच्या पातळीवर किती परिणाम होतो हे दर्शवते.

वजन कमी करण्यात तूप किती फायदेशीर ?

तूप हे सगळ्यांच्या घरी वापरले जाते. मराठी कुटुंबात तुपाचा वापर जास्त केला जातो. मात्र तूप जास्त खाल्ल्याने आपले वजन वाढते ,असे म्हंटले जाते. मात्र असे नाही. तूप खाल्ल्याने पोट नेहमी भरलेले राहते. तुपामध्ये फॅट सॉल्यूबल व्हिटॅमिन्स (Fat Soluble Vitamins) ही असतात, ते वजन कमी करण्यास मदत करतात. तूप जास्त आचेवर गरम केल्यास पेशींच्या कार्याला हानी पोहोचवणाऱ्या कणांची निर्मिती ही थांबते.

किती तूप खावे ?

भारतीय सणाच्या वेळी घराघरांमध्ये तुपाचा वापर जास्त केला वाजतो. मात्र सणांच्या दिवसात नाही तर काही कुटुंबामध्ये अजून सुद्धा पोळीवर जास्त तूप लावून खायला दिले जाते. अगदीच एवढच नव्हे तर तुपामध्ये साखर घालून पोळीचा रिअल बनवून दिला जातो. मात्र हे तूप जास्त लावणे योग्य नाही. ते थोड्या प्रमाणात घेऊन नीट पसरावे. आणि मगच लहान मुलांना खायला दयावे.

त्याचबरोबर असे  म्हंटले जाते, अनेक बी-टाउन सेलिब्रिटी त्यांच्या दिवसाची सुरवात हि तूप खाऊन किंवा तुपात भिजवून ठेवलेल्या सुका मेवा पासून करतात. सकाळी उठल्यावर ते रिकाम्यापोटी एक चमचा तूप खातात. यामुळे बुद्धकोष्ठता दूर राहते आणि वजन कमी होण्यास मदतही होते. आपल्या धकाधकीच्या जीवनात आपले संतुलन आणि आपल्या शरीरात एनर्जी कायम राहावी यासाठी देखील तूप उपयुक्त आहे. तसेच त्वचा ताजेतवाने ठेवण्यासाठी देखील तुपाचा वापर करतात.

हे ही वाचा:

भारतीय नौदलाची नवी झेप

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version