Thursday, July 4, 2024

Latest Posts

Benefits of rice: थंड भात खाण्याचे जाणून घ्या फायदे

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये भात हा एक महत्वाचा पदार्थ आहे. भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाले असे वाटतच नाही. भाताला चपातीप्रमाणेच महत्व दिले जाते. भारतात उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत भात हा असा पदार्थ आहे, जो  दररोज खाल्ला जातो. त्यातही ताजा भात म्हणजेच गरम भात खाणं जास्त फायदेशीर आहे असे अनेकांचा समज आहे. तर काहीजण थंड भात खाल्ल्याने शरीराला त्याचा फायदा होतो असे मानणारे आहेत. अनेक महिला या अन्न वाया जाऊ नये म्हणून आदल्या दिवशीचे किंवा रात्रीचे उरलेले अन्न खातात. पण शिळा भात खाणे अथवा थंड भात खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही याबद्दल माहिती सांगणार आहोत.

गरम भात खाण्याऐवजी थंड भात आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण थंड भातामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. थंड भात खाल्ल्याने आतड्यातील बॅक्टेरिया अन्न पचण्यास मदत करतात. हे आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले  आहे. याशिवाय थंड भात खाल्ल्याने शरीरातील कमी कॅलरी शोषून घेतात. भातामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते. जे पचनासाठी चांगले मानले जाते. भातामध्ये स्टार्चचे प्रमाण असल्याने पचनाचा त्रास होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो. तुम्ही जेव्हाही भात खाल तेव्हा थंड करून खा. अशा पद्धतीने भाताचे सेवन केल्याने त्यातील पोषक तत्व वाढतात. थंड भात हा खाण्यास जड नसल्यामुळे तो खाल्ल्यानंतर पोट जड वाटत नाही. भातात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात आढळतं, जे शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतं.

शिळ्या भाताचे सेवन केल्याने अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पोटदुखी, उलटी-जुलाब होणे, अपचनाचा त्रास अशा अनेक समस्या निर्माण होण्याचा संभव असतो. तसेच शिळ्या भाताचे वारंवार सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ शकते. हा त्रास लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत होऊ शकतो.

जर तुम्हाला योग्य पद्धतीने भाताचे सेवन करायचे असेल तर एका तासाच्या आत भात थंड करून एका भांड्यात काढून ठेवा. भात थंड करण्यासाठी तुम्ही हवाबंद डब्ब्याचा वापर करू शकता. उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तर एका दिवसाच्या आत संपवणे गरजेचे आहे.

हे ही वाचा :

Ashadhi Ekadashi 2024:उपवासाची खिचडी तर नेहमी खातो, मग यावेळी करा काहीतरी नवीन…

काळ्या वर्तुळांनी डोळ्यांना घेतलयं ? तर ‘हा’ उपाय नक्की करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

 

 

 

Latest Posts

Don't Miss