पांढरे तीळ खाण्याचे फायदे

तीळ सर्वांना खायला आवडतेच असे नाही

पांढरे तीळ खाण्याचे फायदे

तीळ सर्वांना खायला आवडतेच असे नाही. तीळ खाल्याने आरोग्याला खूप फायदे होतात. तिळाचे दोन प्रकार असतात. पांढरे तीळ आणि काळे तीळ असे असतात. तीळ हे घरोघरी वापरले जातात. तिळापासून तिळाचे लाडू , तिळाची चटणी , तिळाची चिकी, तसेच मिठाई मध्ये ही देखील वापर केला जातो. तीळ हे शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच तिळापासून तेल ही बनवले जातात. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिम , मॅग्नेशिअम , झिंक , व्हिटॅमिन ,आयन, फायबर ,यासारखे गुणधर्म असतात. तसेच तिळाचे तेल रोजच्या आहारामध्ये ही वापरले जाते.

हे ही वाचा : जीवनातील व्यायामाचे महत्व जाणून घ्या

 

ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास होतो. अशा लोकांनी आहारामध्ये पांढऱ्या तिळाचे सेवन करणे. कारण तिळामध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म असतात. तसेच तिळामध्ये झिंक कॅल्शिम असल्याने रक्तदाब नियंत्रणात असण्यास मदत करते.

तिळामध्ये कॅल्शिम , मॅग्नेशिअम , झिंक , व्हिटॅमिन ,यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे तीळ खाल्याने तुमच्या हाडांना मजबूती मिळते. तसेच खांदेदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यासारख्या समस्या ही देखील दूर होतात. असावेळी तिळाच्या तेलाची तुमच्या गुडघ्यांना मालिश करावी. किंवा तुम्ही तिळाच्या तेलाची मालिश पूर्ण शरीराला केली तर तुमच्या शरीरातील स्नायू मध्ये लवचिकता वाढते आणि हाडे मजबूत होतात.

 

तीळ हे दातांसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. कारण तिळात कॅल्शियम हा घटक असतो. तो आपल्या दाताना बळकटी प्रदान करण्यास मदत करतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी थोडेसे तीळ खाल्यानी दात मजबूत होतात.

हिवाळ्यामध्ये तिळाचे सेवन केल्यास शरीरात उर्जा संक्रमित होते. तसेच तिळाच्या तेलाने मालिश केल्यास चांगली झोप येते. त्यामुळे आपल्याला चांगला आराम मिळून आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतात.

तिळात मोठ्या प्रमाणात फायबर आणि इतर उपयोगी घटक असतात, जे इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेहचा त्रास आहे. त्यांनी तिळाचे सेवन करणे.

जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही केसांना तिळाचे तेल लावू शकता त्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळतो.

हे ही वाचा :

डोळ्याची काळजी कशी घ्यावी?

 

Exit mobile version