प्रोटीनयुक्त असणाऱ्या अंड्याचे फायदे

‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे

प्रोटीनयुक्त असणाऱ्या अंड्याचे फायदे

अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारक आहेत. अंड्यामध्ये पौष्टिक घटक असतात. जे इतर पदार्थापासून सहज मिळत नाहीत. नियमितपणे अंडी खाल्याने शरीर सुदृढ राहते. त्याशिवाय रोगप्रतिकार शक्ती ही वाढते. प्रामुख्याने यातील कॅल्शिअममुळे हाडांना बळकटी मिळते. यातून व्हिटॅमिन ए, बी-6, बी-12, प्रथिने, लोह आणि क्षार मिळते. लहानमुलांचा विकासासाठी अंड हे उपयुक्त ठरते .याशिवाय फॉस्फेट, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारख्या पोषणतत्त्वांच्या चेतापेशींचे संरक्षण, शरीराची वाढ, तजेलदार त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदा होतो. अंड्यातील या बहुगुणांमुळेच ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असे हे म्हणतात.

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए असते. जे खूप फायदेशीर असते. अंडी केसांना लावल्यास केस मजबूत होतात आणि वाढतात. केस वाढीसाठी अंडी केसांना लावणे आणि १० ते १५ मिनिटे लावणे मग धुणे.

कॅल्शिमच्या कमतरतेमुळे हाडे, दात मजबूत होतात. हाडे मजबूत होण्यासाठी आपल्याला विविध औषधांचा वापर करावा लागतो. परंतु आपण हाडे मजबूत करण्यासाठी आणि हाडांना कॅल्शिम मिळवण्यासाठी तुम्ही आहारामध्ये अंडीचा वापर करू शकता. रोज सकाळी सकाळी अंडी नियमितपणे खावीत.

ज्या व्यक्ती जीमला जातात किंवा व्यायाम करतात अशांसाठी अंडी ही फारच फायद्याची असतात. अंड्यामध्ये असलेले घटक वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अंड्यामुळे पोट भरते त्यामुळे इतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे जर तुम्ही जीम किंवा व्यायाम करत असाल तर तुम्ही नियमित अंड्याचे सेवन करायला हवे.

अंड्यांचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. नजर चांगली असेल तर तुम्हाला तुमच्या रोजच्या कामात कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे तुम्ही दररोज अंड्याचे सेवन करावे. अंड्यामध्ये असलेले घटक तुमच्या डोळ्यातील कॉऱनिआ आणि त्याच्या आजुबाजूचा परिसर निरोगी ठेवण्यास मदत करते.

हे ही वाचा:

पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, येणार आशय कुलकर्णी आणि आनंद पंडित यांच्या ‘व्हिक्टोरिया’ साठी एकत्र

बिग बॉस १६ च्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version