त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी द्राक्षे तेलाचे फायदे

त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी द्राक्षे तेलाचे फायदे

द्राक्षे सर्वांना आवडतात. द्राक्ष्यांपासून दारू देखील बनवली जाते. द्राक्षाच्या बियापासून तेल बनवले जाते. तसेच द्राक्षाच्या तेलाचा वापर हा नैसर्गिक सौंदर्य केला जातो. हे वनस्पती तेलासाठी निरोगी पर्याय म्हणून विकले जाते. कधीही त्वचेसाठी आणि केसांसाठी घरगुती उपाय केलेले चांगले असतात. यामुळे आपली त्वचा आणि केस चांगले राहतात आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाही. द्राक्षाचे तेल लावल्यास केस लांब आणि घनदाट होतात आणि त्वचा ही सुंदर चमकदार दिसते.

हे ही वाचा :विराटचे शतक पूर्ण होताच, पत्नी अनुष्काने शेअर केली खास पोस्ट

 

द्राक्षाच्या तेलाचा आपल्या त्वचेसाठी खूप फायदा आहे. द्राक्षाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई चा समावेश केला जातो. त्वचेसाठी व्हिटॅमिन ई उपयुक्त ठरते. या तेलामुळे त्वचेवरील डाग निघून जातात. हे तेल तुम्ही खोबरेल तेलामध्ये मिक्स करून ही लावू शकता.

टाळूच्या त्वचेवर नैसर्गिक स्वरुपात तेल लावले जाते . केस चमकदार आणि निरोगी राहतात. पण वाढत्या वयोमानानुसार केसांमध्येही बदल होत जातात. केस कोरडे होणे, केस गळणे, निर्जीव केसांची समस्या निर्माण होऊ लागते. द्राक्षबियांच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई मुळे केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. तसेच केस निरोगी देखील राहतात.

 

द्राक्षांचा फेसपॅक बनवून ही त्वचेवर लावू शकतो. फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही १० द्राक्षे घ्या आणि मिक्सर मध्ये वाटून बारीक करून घ्या आणि त्यात गुलाबपाणी घ्या हे मिश्रण मिक्सकरून घ्या आणि चेहऱ्यावर लावा त्यामुळे त्वचा चमकदार दिसते.

द्राक्षाचे तेल पचनक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो. तसेच आतडे आणि इतर पाचक अवयवांमधील सूक्ष्मजंतूंशी लढते.

द्राक्षाचे तेल आहारामध्ये ही वापरले जाते. द्राक्षे तेलाचा वापर त्वचा हलकी करण्यासाठी ही देखील केला जातो. किंवा मेकअप काढण्यासाठी ही केला जातो.

द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारख्या अनेक घटक असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे ज्या लोकांना हे रोग आहेत त्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ले पाहिजेत.

हे ही वाचा :

महाराष्ट्रात सर्वत्र विसर्जनाचा जल्लोष मात्र अपघाताच्या घटनांमुळे लागतंय विसर्जनाला गालबोट

 

Exit mobile version