Wednesday, June 26, 2024

Latest Posts

Walnut Dryfruit: नियमित सेवन केल्याने ‘काय’ होतात फायदे?

अक्रोड हे असे ड्रायफ्रूट आहे जे तुमच्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी खूप प्रभावी आहे. . मेंदूसाठी हे 'सुपर फूड' म्हटले जाते. अक्रोड या ड्रायफ्रूटचे अनेक फायदे आहेत. ते काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया.

बाजारामध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात. त्यात काजू, बदाम, मनुका, अक्रोड आणि खजूर अशा अनेक ड्रायफ्रुट्सचा समावेश होतो . ड्रायफ्रुट्समधून शरीराला भरपूर प्रमाणात अनेक पोषक घटक मिळतात. त्यात अक्रोड हे ड्रायफ्रूट् हे अनेक गुणांनी संपन्न आहे. अक्रोड हे असे ड्रायफ्रूट आहे जे तुमच्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी खूप प्रभावी आहे. अक्रोड या ड्रायफ्रूटचे अनेक फायदे आहेत. या ड्रायफ्रुटचा आकार हा मेंदूसारखा असतो. मेंदूसाठी हे ‘सुपर फूड’ म्हटले जाते. त्यामुळे त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ते काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया.

अक्रोड खाल्ल्याने आरोग्यावर होणारे फायदे:

  • आरोग्यासाठी अक्रोड हे फायद्याचे असले तरी याचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे. अक्रोड हे मानसिक आरोग्याच्या समस्यांवर औषधासारखे काम करते.
  • अक्रोडमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात अनेक जीवनसत्वे आढळतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी १२ हे मेंदूसाठी आवश्यक आहे. तसेच यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह असे अनेक जीवनसत्वे आहेत, जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
  • अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते जे मेंदूसाठी फायदेशीर आहे. तसेच ओमेगा-३ फॅटी ॲसिड या घटकामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत तर होतेच शिवाय त्वचा सतेज ठेवते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता देखील वाढते.
  • अक्रोडमध्ये उच्च अँटिऑक्सिडंट असतात याशिवाय चांगले फॅट्स असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जातात. अक्रोडाच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
  • अक्रोडाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्याच्या सेवनाने भूक नियंत्रित राहते. यामुळे चयापचय शक्ती वाढून कॅलरीज लवकर बर्न होण्यास मदत होते.
  • अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते.
  • अक्रोड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन रक्तदाब नियंत्रित होतो आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
  • अक्रोडचे सेवन हे हाडे मजबूत करण्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये असलेले अल्फा लिनोलिनीक ॲसिड हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच भिजवलेले अक्रोड रिकाम्या पोटी खाल्ल्याने हाडे व दात मजबूत होतात. 

 

हे ही वाचा

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहा; ‘अशी’ घ्या मुलांची काळजी

 

Chatrapati Shahu Maharaj Jayanti: देशाला लाभलेल्या लोकशाहीवादी राजेंना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss