spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भेगा पडलेल्या ओठांची काळजी घेण्याव्यतिरिक्त अशा पद्धतीनेही होऊ शकतो पेट्रोलियम जेलीचा वापर, जाणून घ्या फायदे

पेट्रोलियम जेली नैसर्गिक मेण आणि खनिज तेलापासून बनविली जाते, जी लावल्यास त्वचेत ओलावा निर्माण होतो आणि कोरडेपणा दूर होतो.

हिवाळा सुरू होताच व्हॅसलीनचा छोटा बॉक्स प्रत्येकाकडे दिसू लागतो. हिवाळ्यात कोरडी त्वचा टाळण्यासाठी आपण व्हॅसलीनचा वापर करतो. हे सामान्य क्रीम आणि लोशनपेक्षा बरेच चांगले आणि स्वस्त असते. इतकंच नाही तर मुली त्याचा मेकअप प्रोडक्ट म्हणूनही वापर करतात.

पेट्रोलियम जेली नैसर्गिक मेण आणि खनिज तेलापासून बनविली जाते, जी लावल्यास त्वचेत ओलावा निर्माण होतो आणि कोरडेपणा दूर होतो. पेट्रोलयम जेली पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्यामुळे ती लावल्याने कोणतेही नुकसान होत नाही. पण, तुम्हाला माहित आहे का कि कोरड्या त्वचेची निगा राखण्याऐवजी पेट्रोलियम जेलीचे एक ना अनेक फायदे आहेत? चला तर मग जाणून घेऊया…

हे आहेत व्हॅसलीनचे आश्चर्यकारक फायदे:

  • जर तुम्हाला चेहऱ्यासाठी स्क्रब बनवायचा असेल, तर व्हॅसलीनमध्ये थोडीशी साखर मिसळा आणि त्वचेवर हलके मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकल्या जातील आणि स्वच्छ त्वचा दिसून येईल, ज्यामुळे चेहरा उजळून येईल.
  • जर पपण्यासुद्धा लहान असतील तर तुम्ही त्यावर नियमित व्हॅसलीन लावू शकता. यामुळे तुमच्या पापण्या लांब आणि चमकदार दिसतील आणि तुम्हाला आर्टिफिशियल लॅशेस वापरण्याचीही गरज भासणार नाही.

  • ग्लोइंग स्किनसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर व्हॅसलीन लावा. रोज लावल्याने चेहरा सुधारेल आणि चेहरा गोरा आणि चमकदार होईल.
  • तुमचे केस कुरळे असतील आणि ते सरळ करायचे असतील तर त्यावर थोडंसं व्हॅसलीन लावा. याच्या मदतीने तुम्ही स्प्लिट एंड्स देखील फिक्स करू शकता.
  • जर तुमचाही कोपर गडद आणि काळा होत असेल तर तुम्ही त्यावर पेट्रोलियम जेली लावू शकता जेणेकरून ते स्वच्छ आणि मऊ होईल. रात्री झोण्यापूर्वी पेट्रोलियम लाऊन दोन मिनिटे मसाज केल्याने काही दिवसातच त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023, आज संक्रांतीचा पहिला दिवस, भोगीच्या दिवशी नक्की काय करतात ?

कॉफीचे अतिसेवन केल्याने शरीरावर होतील गंभीर परिणाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss