हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

हिवाळ्यात आपली त्वचा थंडीमुळे कोरडी पडते.चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात,स्किन कडक होते असे अनेक समस्या उद्भवतात.

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

हिवाळ्यात आपली त्वचा थंडीमुळे कोरडी पडते.चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात,स्किन कडक होते असे अनेक समस्या उद्भवतात., त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या खूप त्रासदायक ठरतात. हिवाळ्यात अनेकजण चेहरा आणि हातांची काळजी घेतात.मात्र ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याची काळजी घेतो तसेच आपल्या पायाकडे आपण दुर्लक्ष करत असतो.त्यामुळे पाय घाण आणि बॅक्टेरिया पायांच्या तळव्यावर आणि टाचांवर साचतात.हिवाळ्यात पायांच्या तळव्यांना आणि टाचांवर मृत त्वचा साचल्याने अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी पाय स्वच्छ आणि सॉफ्ट करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च केला जातो.मात्र आता हे करण्याची गरज नाही. तळव्यावर साचलेले हे घाण पेशी आपण घरच्या घरी स्क्रब तयार करुन काढु शकतो.यासाठी नेमके कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊयात.

साखर आणि लिंबाचा स्क्रब

साखर आणि लिंबाचा स्क्रब हा उपाय सगळ्यात बेस्ट आहे.लिंबू व्हिटॅमिन सी आणि ऍसिडिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. लिंबू केवळ त्वचा स्वच्छ करण्यासाठीच नाही तर त्वचेवरील रंग सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे. स्क्रब बनवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये साखर मिक्स करा आणि पायाच्या तळव्यांवर लावून मसाज करा. पण, त्याआधी तुमचे पाय कोमट पाण्यात सुमारे १० ते १५ मिनिटं ठेवा आणि नंतर टॉवेलने पुसून स्क्रब करा.

सैंधव मिठाने स्क्रब तयार करा

सैंधव मिठाचा ही उपाय स्क्रब करण्यासाठी योग्य ठरतो .पायाच्या तळव्यांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी, ऑलिव्ह ऑईल आणि आवश्यक तेलाचे काही थेंब रॉक सॉल्टमध्ये घाला आणि चांगले मिक्स करा. एकदा ग्राइंडरमध्ये बारीक करा किंवा काही काळ बाजूला ठेवा, जेणेकरून जाड मीठ विरघळू लागेल. हा स्क्रब तुम्ही शरीरावरही लावू शकता. गोलाकार हालचालीत हळूवारपणे पायांवर स्क्रब करा आणि कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

बेकिंग सोड्याने मृत त्वचा स्वच्छ होईल

हिवाळ्यात पाय खुप कडक होतात.अशावेळी पायांच्या टांचावर मृत त्वचा तयार होते.मृत त्वचेमुळे पाय फार कडक होतात. अशा वेळी कोमट पाण्यात एक ते दीड चमचा बेकिंग सोडा मिक्स करा आणि त्यात पाय सुमारे 20 ते 30 मिनिटे ठेवा. यानंतर, प्युमिस स्टोन किंवा मऊ ब्रशच्या मदतीने मृत त्वचा स्वच्छ करा. यानंतर, टॉवेलने पाय नीट पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा.अशा पद्धतीत तुम्ही घरच्या घरी स्क्रब तयार करत पायांची विशेष काळजी घेऊ शकता.

हे ही वाचा:

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत  नवा ट्विस्ट,नयना-अद्वैतच्या लग्नात नवरीच्या वेशात दिसतेय कला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version