Health Tips विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Health Tips विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

betel leaf : झाडांच्या पानांमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्याच पानांमध्ये विड्याचे पण देखील असते. भारतात जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आहे. पण पान खाणे ही चांगली सवय नाही यामुळे दात खराब होतात आणि दाताचे आरोग्य देखील खराब होऊन जाते. भारतीय परंपरेनुसार देवालाही पानाचा विडा दाखवण्याची पद्धत आहे. प्रत्येक पूजेत किंवा सणासुदीला विडयाच्या पानाचा वापर केला जातो आणि ते शुभ देखील मानले जाते. तसेच या विड्याच्या पानांचे अनेक औषधी गुणधर्म आहे. बहुतेक लोकांना नुसत विड्याचं पान खायाला आवडत नाही, विड्याच्या पानांसोबत तंबाकू-सुपारी खायाला पसंत करतात. पण हे पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मग जाणून घेऊया विड्याच्या पानांचे फायदे.

बहुतेक लोकांना भूक न लागण्याची समस्या उद्भवत असते. त्यांनी विड्याच्या पानाचे सेवन करावे विड्याचे पान (betel leaf ) सेवन केल्याने भूक लागण्यास मदत होते, सकाळच्या नाश्त्याच्या सोबत काळीमिरी आणि विड्याचे पाने सेवन करणे यामुळे भूक लागण्यास मदत होते.

 

विड्याचे पाने सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच त्यामध्ये अँटी डायबिटीक (Anti diabetic) गुणधर्म आढळून येतात. एका संशोधनच्या अहवालानुसार जी लोक या पानाचे सेवन करतात त्यांना मधुमेह सारखा आजार होण्याचा धोका कमी होतो.

विड्याच्या पानाचा रस तुम्ही जखमेवर लावला तर तुम्हाला लगेच आराम मिळेल. तसेच तुम्ही या पानाचा वापर शरीरावर फोड आल्यास ते घालवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. विड्याची पान गरम करून त्यावर थोडे एरंडेल तेल घेणे आणि ज्या ठिकाणी फोड आली आहे त्या ठिकाणी लावणे.

जर तुम्हाला सर्दी, खोकला झाला असेल तर त्यावर तुम्ही उपाय म्हणून विड्याची पाने वापरू शकता. सर्दी खोकला कमी करण्यासाठी तुम्ही विड्याची पाने मधासोबत सेवन करणे. असे केल्याने सर्दी, खोकला बरा होण्यास मदत होईल.

विड्याची पाने सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पण जास्त प्रमाणात खाऊ नये, कमी प्रमाणात सेवन करावी. पण कोणतेही घरगुती उपाय करतांना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचा आहे.

हे ही वाचा : 

Datta Jayanti 2022 दत्तजयंतीनिम्मित जाणून घ्या भगवान दत्ताची कथा

 

Exit mobile version