Body ache in winter हिवाळ्यात अंगदुखी होते का ? जाणून घ्या उपाय

Body ache in winter हिवाळ्यात अंगदुखी होते का ? जाणून घ्या उपाय

हिवाळा सुरू झाला की अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी अश्या समस्या उद्भवत असतात. थंडीमध्ये जास्त प्रमाणात अंगदुखी होत असते. प्रत्येकाच्या सांधेदुखीचे कारणे वेगवेगळे देखील असू शकते. थंडीच्या वातावरणात अश्या समस्या उद्भवत असल्याने लोक पेन रिलिज क्रीम लावतात. पण तेवढ्यापुरताच बरे वाटते. त्यानंतर परत अंगदुखी गुडघेदुखी, सांधेदुखी या समस्या परत उद्भवत असतात. काहीवेळा तर सूज देखील येते. अश्या गोष्टीवर उपचार म्हणून तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकतात.

कामात व्यस्त असणे आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष असे केल्याने त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. सुरुवातीला त्याचा त्रास जाणवत नाही, पण जर तो त्रास जास्त प्रमाणात वाढला तर समस्या उद्भवता. त्यामुळे अंगदुखी वाढते. अश्या समस्यांवर वेळीच औषध उपचार करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया.

अंगदुखीवर जास्त प्रमाणत झाल्याने त्यावर उपाय म्हणून तुम्ही सर्व प्रथम गरम पाणी करून घ्या, आणि त्या पाणीमध्ये एक कापड घालून घ्या. आणि तो कापड थंड होऊन द्या. कापड थंड झाल्यावर प्रभावित जागेवर लावून घेणे आणि २० मिनिटे तरी लावून ठेवा. असे केल्याने अंगदुखी थांबण्यास मदत होईल.

सतत मोबाइल आणि कॉम्प्युटरवर काम केल्याने अंगदुखी होते. अंगदुखी कमी करण्यासाठी तुम्ही पौष्टिक आहाराचा वापर करा. आणि जास्त करून व्हिटॅमिन फायबर असलेले पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करा.

अंगदुखी कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. कोणत्याही आजारांवर उपचार म्हणून तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. तसेच तुम्ही हळदीचा वापर दुधामध्ये मिक्स करून देखील सेवन करू शकता. किंवा प्रभावित ठिकाणी हळदीची पेस्ट करून देखील तुम्ही लावू शकता. यामुळे अंगदुखी थांबते. शरीरात पौष्टिकची कमतरता असणे, थकवा येणे, अश्या लक्षणांमुळे अंगदुखी होऊ लागते.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकारांचं प्रतिआरोप

Vikram Gokhale : असा नट पुन्हा होणे नाही

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version