दिवाळीत सोने खरेदी करताय ? तर घ्या अशी काळजी…

दिवाळीत सोने खरेदी करताय ? तर घ्या अशी काळजी…

दिवाळीत आपण अनेक प्रकारचे सोन्याचे दागिने खरेदी करतो. सणसमारंभात कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे काम दागिने करत असतात. सोने (Gold) हा धातू इतर धातूपेक्षा खूप महाग असा धातू आहे. तसेच दिवाळीत सोन्याचा दुकानांमध्ये जास्त प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करतांना अनेकवेळा फसवणूक होते. दिवाळीत लोक धनतेरसच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोने खरेदी करतात. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून सोने खरेदी करतांना कशी काळजी घ्यावी ते सांगणार आहोत.

हे ही वाचा : Resume : उत्तम बायोडेटा कसा तयार करावा ?

 

लक्ष्मीपूजनच्या दिवशी काही लोक सोने खरेदी करतात. पण सोने खरेदी करतांना काळजी घ्यावी. कारण सणासुदीच्या काळात सोन्याचा खूप भाव वाढतो. बाजारात सोने खरेदी करताना फसवणूक होत असल्याची जास्त प्रमाणात तक्रार असते. सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास तुमची देखील फसवणूक होऊ शकते.

सोने खरेदी करतांना सोन्याची शुद्धता पाहणे खूप गरजेचे आहे. शुद्ध सोने कसे ओळखावे हे तुम्हाला समजले पाहिजे. सण कोणते पण असुदे सोन्याचे दागिने खरेदी करतांना तुम्ही नेहमी जागरूक राहिले पाहिजे. तसेच सोने खरेदी करतांना तुम्ही ऑनलाइन डेबिट कार्डचा देखील वापर करू शकता.

 

सोने खरेदी करताना सोन्याच्या किंमती तपासा. कारण सोन्याच्या किंमतीत नेहमी चढ-उतार चालू असतात. तुम्ही कोणत्या पण शहरात राहा पण सोने खरेदी करतांना किंमती नीट बघून घ्या. कारण काही सोने वाले भाव जर कमी असला सोन्याचा तरी जास्त भावात सोने विक्री करतात. तुम्ही २४ कॅरेट carat, २२ कॅरेट, १८ कॅरेट सोने खरेदी करतांना जरा जपून खरेदी करा. कारण यामध्ये देखील अशुद्ध सोने मिक्सकरून सोने विक्रीसाठी ठेवतात.

सोने खरेदी करताना सोन्याच वजन ग्राम नीट पारखून घ्या. सोन्याची खरेदी करून झाल्यानंतर बिल घ्याला विसरू नका. काही वेळेस असे होते की सोने खरेदी करतो आपण आणि त्या उत्साह मध्ये बिल घ्याचे विसरतो. कधी कधी असे होते की घराच्या काही कारणामुळे आपल्याला सोने घान ठेवावे लागते पण आपल्याकडे बिल नसते त्याचा फायदा देखील सोनारवाले उचलतात.

हे ही वाचा : 

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे

 

Exit mobile version