साबुदाणा खरेदी करताय… ? मग या बाबी नक्की लक्षात घ्या

साबुदाणा खरेदी करताय… ? मग या बाबी नक्की लक्षात घ्या

अनेक लोक उपवासाच्या वेळी साबुदाणा खरेदी करतात. आता बरेच सण आले आहेत त्यामुळे साबुदाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. नाश्त्यासाठी साबुदाणा हा चांगला पदार्थ आहे. साबुदाणा केवळ उपवासासाठी नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. साबुदाण्याचे वेगवेगळे प्रकार येतात. साबुदाण्याचा सकाळच्या नाश्त्यासाठी ही उपयोग केला जातो.

हे ही वाचा : आरोग्यासाठी गाजर खाण्याचे फायदे

साबुदाणा चांगल्या प्रतीचा निवडणे कठीण जाते. मात्र, अनेक वेळा असेही घडते की, साबुदाणा हा वरून दिसायला चांगला दिसत असला तरी आतून पोकळ असतो. काही लोक साबुदाणा नीट पारखून घेत नाही. साबुदाणा विकत घेताना दगडी तर नाही ना हे देखील निवडून घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा साबुदाण्यामध्ये छोटे दगड आढळतात. त्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कधीपण साबुदाणा विकत घेताना साबुदाणा नीट पारखून घ्या. अन्यथा काहीवेळा दुकानदार साबुदाणा घेताना फसवतात. साबुदाणा पोकळ बारीक अशा प्रकारे देतात. सणासुदीमध्ये साबुदाण्याची किंमत वाढवली जाते. हव्या त्या किंमतीत मिळत नाही. म्हणून साबुदाणा विकत घेताना जास्त महाग नाहीना अश्या सर्व गोष्टी पाहून घ्या.

साबुदाण्याचा रंग हलका पांढरा असतो. काही वेळा दुकानदारांकडे पांढरा आणि पिवळा असा साबुदाण्याचा रंग असतो . मात्र असे साबुदाणा घेणे टाळा . अश्या साबुदाण्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. तसेच अश्या साबुदाण्यामुळे तुमचे आरोग्य बिगडू शकते.

साबुदाणा विकत घेताना त्याचा नीट आकार बघून तो विकत घेणे. साबुदाण्यामध्ये लहान मोठे असे आकार असतात. साबुदाणा विकत घेताना तो जास्त नरम नाही ना किंवा जास्त कडक नाही ते नीट बघून घेणे.

साबुदाणा दोन प्रकारात मिळतात. साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मोठ्या आकाराचा साबुदाणा मिळतो आणि साबुदाणा खीर बनवण्यासाठी बारीक साबुदाणा देखील मिळतो.

हे ही वाचा :

कॉमेडियन कपिल शर्मा करणार पिझ्झा डिलिव्हरी!

 

Exit mobile version