Thursday, July 4, 2024

Latest Posts

हे केल्यास आयुष्यात Skin Disease होणार नाहीत ; जाणूयात सविस्तर

काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही,

मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा आपण आपल्याकडे लक्ष देणे कमी करतो. याचा परिणाम हा फार दूरगामी होतो. या दैनंदिन जीवनात स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला काही आजार हे सुरुवातीला अगदीच चुटे समजतो. पण ते पुढे जाऊन प्रचंड त्रासदायक ठरू शकतात. 

यासाठी स्वतः कडे लक्ष देणं फार गरजेचे आहे. काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही, पुढीलप्रमाणे जर सतत ८ दिवस या मिश्रणाने अंघोळ केली, तर आयुष्यात चर्मरोग होणार नाही अशी खात्री आपण या आयुर्वेदिक उपचारावर देऊ शकतो. अनेक वेळा शरीरावर लहानसहान बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्वचेला खाज सुटण्यासारखे प्रकार होतात, ते देखील बंद होतील.

  • तुरटी एक चांगला उपाय :

तुरटी जी सहज किराणा दुकानावर उपलब्ध होते, १० रूपयाला ५० किंवा १०० ग्रॅम असा तुरटीचा भाव आहे. एका प्लास्टीकच्या बाटलीत तुरटीचे लहान-लहान तुकडे करून त्यात पाणी टाकावे. यानंतर तुरटीचे हे द्रावण तयार होईल. हे द्रावण अंगाला अशा ठिकाणी लावावे, ज्या ठिकाणी घाम जमा होतो अथवा खाज सुटण्याची शक्यता अधिक असते. जसे डोके, काखेत आणि मांड्यांच्या मध्ये. काखेत तुरटीचे द्रावण लावल्याने दुर्गंधी जाण्यासही मोठ्याप्रमाणावर मदत होते.

  • या द्रावणाचा फायदा :

तुरटीचे हे द्रावण लावल्यानंतर पाच मिनिटात सुकते. सुकल्यानंतर पांढरे स्फटीक स्पष्ट दिसतात, यानंतर अंघोळ करावी  अशी आंघोळ सतत ८ दिवस आणि वर्षभरात ४ वेळा केल्यास  कोणत्याही प्रकारचे गजकर्ण, नायटा यांसारखे आजार अजिबात होणार नाहीत. शिवाय शरीराची दुर्गंधी नाहीशी होते.

  • या मिश्रणाने अंघोळ करताना घ्यावयाची काळजी :

आंघोळ करताना तुरटीचे पाणी डोळ्यात जाणार नाही याची दक्षता घेणे विशेष आवश्यक आहे. हे पाणी डोळ्यात गेल्यास अधिक जळजळ होते. तसेच त्याचा परिणामही दूरगामी होतो. यासाठी डोके धुतांना डोळे घट्ट मिटावे. आरोग्य हा आपला सर्वात महत्वाचा असा दागिना आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात प्रचंड त्रास हा शरीराला होत असतो. त्यात जर तो आरोग्याचा प्रश्न असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे होऊन जाते.आयुष्यात चर्मरोग होणार नाही अशी खात्री आपण या आयुर्वेदिक उपचारावर देऊ शकतो. अनेक वेळा शरीरावर लहानसहान बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्वचेला खाज सुटण्यासारखे प्रकार होतात, ते देखील बंद होतील.

हे ही वाचा:

VIDHAN PARISHAD ELECTION : ज्येष्ठ नेत्यांनी PANKAJA MUNDE यांना दिला बुस्टर डोस ; अर्ज भारण्यापूर्वी माध्यमांशी साधला भावुक संवाद THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss