Chandra Grahan 2024 : कसं असेल वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण? गर्भवती महिलांनी घ्यावी अशी काळजी…

Chandra Grahan 2024 : कसं असेल वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण? गर्भवती महिलांनी घ्यावी अशी काळजी…

Chandra Grahan 2024: या वर्षांमधील हे दुसरे चंद्रग्रहण असून पितृपक्षात होणार आहे. हिंदू धर्मामध्ये १५ दिवसांच्या पितृपक्षाला खपू महत्त्व आहे. या दिवसांमध्ये पितरांना तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. हे चंद्रग्रहण मीन राशीमध्ये होणार आहे. हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार का? आणि त्याची योग्य वेळ कोणती याबात अनेक लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. चला तर चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया…

पितृ पक्षात लागणारे हे चंद्रग्रहण बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे झाले. चंद्रग्रहण हे इतर अनेक देशामध्ये दिसणार आहे. वास्तविक, परदेशी वेळेनुसार हे चंद्रग्रहण १७ सप्टेंबरच्या रात्री दिसेल. मात्र भारतामध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी १८ सप्टेंबर रोजी होईल.

भारतामध्ये चंद्रग्रहण कधी आणि किती वेळ असणार?

१८ सप्टेंबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी सुरू झाले. तसेच चंद्रग्रहण रात्री १० वाजून १७ मिनिटांनी संपणार आहे. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे ५ तास ०४ मिनिटे असेल.

चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार का ?

पितृ पक्षामध्ये येणारे हे उपांत्य चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे खंडग्रास चंद्रग्रहण अफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोप आणि आशियाच्या काही भागांसह जगभरातील ५ खंडामध्ये दिसणार आहे.

चंद्रग्रहण पितृपक्षात आल्याने गर्भवती महिलांणतीनी को काळजी घ्यावी ?

ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी म्हणजे गर्भातील बाळावर येणार नाही संकट. पुढील काही कामे ग्रहण संपल्यावर केल्यास गर्भातील बाळावर कोणतेही संकट येणार नाही. स्नान:ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी सर्वात पहिले स्नान केले पाहिजे. यामुळे ग्रहणाची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. तसेच मन प्रसन्न होईल. देवाची पूजा: गर्भवती महिलांनी मनोभावे देवाची पूजा करावी देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. यामुळे मनात सकारात्मक विचार येतात आणि मन प्रसन्न राहते. जे बाळासाठी देखील चांगले असते.

सुतक नियम पाळावे की नाही?

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे कोणतेही सुतक पाळण्याची गरज नाही. जर हे चंद्रग्रहण भारतात दिसले असते तर सुतक काळातील नियम पाळले गेले असते.

Devendra Fadnavis यांनी कितीही गणितं करू द्या, सगळी गणितं मोडून टाकणार; Manoj Jarange Patil यांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version