Sunday, June 30, 2024

Latest Posts

अगदी सोप्या पद्धतीने बनवा केमिकल फ्री Eyeliner, पण कसे?

आयलायनर एखाद्याच्या डोळ्यांमध्ये गेले तर त्याने इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशावेळी तुम्ही केमिकल फ्री जेल आयलायनर घरच्या घरी बनवले तर त्याचा तुमच्या डोळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. तर हे घरगुती आयलायनर कसे बनवायचे हे जाणून घ्या.

आजकाल अनेक मुली त्यांचे डोळे सुंदर आणि रेखीव दिसावेत म्हणून डोळ्यांना काजळ आणि आयलायनर आवर्जून लावतात. आयलायनर हे डोळ्यांचे सौंदर्य अजून खुलवतात. बहुतेक मुली अथवा महिला मेकअप करताना डोळे लावायला  विसरत नाही. सध्या जेल आयलायनर हा प्रकार ब्युटी प्रोडक्टसमध्ये बराच ट्रेंडमध्ये आहे. तसेच बाजारात ड्राय आयलायनर, मॅट आयलायनर, मस्करा आयलायनर असे लायनरचे अनेक प्रकार आले आहेत. परंतु काहीवेळा बाजारात मिळणारे जेल आयलायनर हे अनेक केमिकल मिसळून बनवलेले असतात, अशावेळी हे आयलायनर एखाद्याच्या डोळ्यांमध्ये गेले तर त्याने इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशावेळी तुम्ही केमिकल फ्री जेल आयलायनर घरच्या घरी बनवले तर त्याचा तुमच्या डोळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. तर हे घरगुती आयलायनर कसे बनवायचे हे जाणून घ्या.

होममेड आयलायनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • एक लहान आकाराची वाटी
  • २ ते ४ थेंब आय प्रायमर
  • २ ते ४ थेंब नारळाचे तेल
  • चिमूटभर आयशॅडो पावडर

होममेड आयलायनर कसे बनवायचे?

  • होममेड आयलायनर बनवण्यासाठी एक रिकामी वाटी घ्या.
  • त्यात २ ते ४ थेंब आय प्रायमर आणि २ ते ४ थेंब नारळाचे तेल घालावे.
  • या दोन्ही गोष्टी व्यवस्थित एकत्र करून गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करत राहा.
  • त्यात तुमच्या आवडत्या रंगाची आयशॅडो पावडर मिक्स करा.
  • तुमचे आवडत्या रंगाचे जेल होममेड आयलायनर तयार आहे.

होममेड आयलायनर लावताना वापरायच्या सोप्या Tips  

  • आयलायनर लावताना एका हातात आयलायनरचा ब्रश धरा आणि दुसऱ्या हाताने ज्या डोळ्याला आयलायनर लावणार आहात, त्याचं शेवटचं टोक हलक्या हाताने ओढून पकडा. असे केल्याने डोळ्याच्या वरच्या भागावरच्या हलक्या लाइनही झाकल्या जातील, त्यावर आयलायनर लावणे सोपे जाईल.
  • आयलायनर लावताना सुरुवात नेहमी डोळ्यांच्या नाकाच्या बाजूचे जे टोक असते तिथूनच करा.
  • आयलायनर लावताना ब्रश नेहमी हलक्या हाताने पकडावा. तसेच ब्रश तुमच्या डोळ्याच्या खालून किंवा वरून पकडू नका, डोळ्यांच्या समान रेषेत ब्रश पकडा.
  • सगळ्यांना आयलायनर लावताना येणारी समस्या म्हणजे हातांची थरथर. हातांची थरथर कमी करण्यासाठी डोळे अगदी सावकाशपणे बंद करा. त्याची हालचाल झाली नाही तर आयलायनर एकदम व्यवस्थित लागेल. आयलायनर लावल्यानंतर लगेचच डोळा उघडू नका. १० ते १५ सेकंद डोळा बंद राहू द्या आणि त्यानंतर हळुवारपणे उघडा.
  • आयलायनर लावताना एका हातात आरसा घ्या आणि हनुवटीच्या खाली धरा. आता आरशात खाली पहा आणि आयलायनर लावा. यामुळे आयलायनर लावणे सोपे होईल आणि पूर्ण रेषा बनवू शकाल.

हे ही वाचा

मुलींनी फॅशन स्टायलिश लुकसाठी ‘हे’ नक्की वाचा

Litchi Fruit Benefits: लिची तुम्हाला आवडते का? फायदे वाचून व्हाल थक्क…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss