पावसाळ्यात सुकवा असे कपडे

पावसाळा हा ऋतु अनेकांना आवडतो.मात्र जेव्हा पावसामुळे कपडे ओले होतात आणि वातावरणातल्या ओलाव्यामुळे कपडे सुकण्याच्या अडचणी येतात.

पावसाळ्यात सुकवा असे कपडे

पावसाळा हा ऋतु अनेकांना आवडतो.मात्र जेव्हा पावसामुळे कपडे ओले होतात आणि वातावरणातल्या ओलाव्यामुळे कपडे सुकण्याच्या अडचणी येतात.तर पावसाळ्यात सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे कपडे सुकवण्याचे. बाहेर पाऊस सुरु असताना कपडे कुठे वळत घालावे हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण बाहेर पाऊस असतो आणि घरात कपडे वळवले तरी त्याला कुबट वास लागतो आणि कपड्यांना दुर्गंधी येते. तर आज आम्हीं तुम्हांला लवकर कपडे सुकवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

कपडे सुकवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे हेअर ड्रायर. घरीच कपडे सुकवायचे असतील किंवा तुम्ही कुठे प्रवासात असलात तरीदेखील हेअर ड्रायर हा कपडे सुकवण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र हेअर ड्रायर पातळ किंवा माध्यम जाडीचे कपडे सुकवण्यासाठी उपयुक्त आहे. जास्त जाड कापण्यासाठी हे हवे तसे काम करणार नाही.

इस्त्री म्हणजेच आयर्नचा  वापर करा. कपड्यातून व्यवस्थित पाणी काढून टाकल्यानंतर या कपड्यांना इस्त्री करा. कमी टेम्परेचरवरच काड्यांना इस्त्री करा. इस्त्री जास्त गरम झाल्यास ती बंद करा आणि थोडा वेळाने पुन्हा सुरु करा.

पावसाळ्यात वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याचा प्रयत्न करा. कारण मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर ते ड्रायरमध्ये  सुकवता येतात. ड्रायरमध्ये कपड्यांमधून बरेच पाणी निघून जाते त्यामुळे ते बऱ्याचअंशी वळतात आणि नंतर कमी वेळात कोरडे होतात.

पावसाळ्यात घराबाहेर कपडे सुकवणे अनेकदा शक्य होत नाही. तेव्हा घरात कपडे सुकवावे लागतात. अशावेळी कपडे व्यवस्थित पिळून त्यातून शक्य तितके जास्त पाणी काढून घ्या आणि ते घरात वळत घाला आणि घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे घर ओलसर होणार नाही. तसेच कपडे लवकर सुकवण्यासाठी घरातील पंखादेखील सुरु ठेवा.

Exit mobile version