गरजेपेक्षा जास्त लवंगाचे सेवन करून नये, आरोग्यास हानिकारक ठरू शकते

गरजेपेक्षा जास्त लवंगाचे सेवन करून नये, आरोग्यास हानिकारक ठरू शकते

लवंग एक मसाल्यामधला पदार्थ आहे. लवंग रोजच्या आहारात देखील वापरली जाते. तसेच लवंग खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लवंगमध्ये प्रोटीन, एनर्जी, फायबर, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर तुम्हाला दात दुखण्याची समस्या असेल तर तुम्ही लवंगचे सेवन करू शकता. पण लवंग जास्त सेवन केल्याने आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. चला तर मग जाणून घेऊया लवंगाचे जास्त सेवन केल्या काय परिणाम होतात.

हे ही वाचा: पासपोर्ट कसा बनवायचा ? जाणून घ्या…

 

लवंग खाणे, लवंग पावडर, लवंग चावून खाणे हे आरोग्यासाठी नुकसान कारक ठरू शकते. तसेच चहा बनवताना काहीजण लवंगचा वापर करतात. पण ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

तसेच लवंग पुरुषांसाठी देखील नुकसान कारक ठरू शकते. पुरुषांनी जास्त प्रमाणत लवंगचे सेवन केले की शरीरातील टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन कमी होऊ शकते. जेव्हा या हार्मोनची कमतरता असते तेव्हा लैंगिक क्षमता, चेहऱ्यावर केस, मानसिक आरोग्य इत्यादी समस्या देखील उद्भवू शकतात.

 

लवंगाचे तेल हातापायांना लावल्यास काही नुकसान होत नाही. पण काहीजणांना या तेलामुळे नुकसान होते. जसे की खाज येणे, एलर्जी येते , शरीर लाल होते अशी लक्षणे दिसून येतात. त्याच प्रमाणे लवंग तेलाचा वापर दात, हिरड्या, गाल यांच्यावर केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच लवंगाचे तेल रोजच्या जेवणासाठी वापरू नये नाही तर शरीराला खूप नुकसान होऊ शकतात.

मधुमेह असल्यास लवंगाचे सेवन करू नये. सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे.

लवंग जास्त प्रमाणत सेवन करू नये. कारण लवंग सेवन केल्यास ते गरम पडतात आणि मासिक पाळीच्या वेळी खूप वेदना होतात. आणि मूळव्याध असल्यास लवंगाचे सेवन करू नये.

हे ही वाचा: 

घरच्या घरी बनवा मसाला खिचडी

 

Exit mobile version