Tuesday, October 1, 2024

Latest Posts

सर्दी खोकला असू शकते ‘या’आजाराचे लक्षण, काळजी घ्या

सर्दी खोकला ही सामान्य बाब नाही. सर्दी खोकला झाल्यास तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देत आहेत. बदलत्या ऋतूमुळे आपल्याला सर्दी खोकला होतो. सर्दी खोकला झाल्यास फ्ल्यू (flu) , यासारखे तापाचे संसर्ग पसरत आहे. काही लोक असे झाल्यास मेडिकल मधून औषध घेतात. पण असे करणे हे चुकीचे आहे. तुम्हाला काही आजार झाल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि वेळेवर उपचार सुरू करावे. तर जाणून घेऊया सर्दी खोकल्यामुळे कोणते आजार होतात.

हे ही वाचा : ऑनलाइन वस्तू खरेदी करताना फसवणूक होते?, ग्राहकांनी अशी घ्या काळजी

 

तुम्हाला डेंग्यू , मलेरिया झाल्यास डॉकटरांचे म्हणे ऐकून घ्यावे. या आजारांची सुरूवात ही ताप ,सर्दी खोकल्या पासून होते. डेंग्यू , मलेरिया या आजारांचे लक्षणे फ्ल्यू सारखीच असतात. त्यामुळेच या आजाराकडे दुर्लक्ष करतात. पण असे कधीच करू नये. अशावेळी लोकांनी या आजरांची लक्षणे समजून घेतली पाहिजे आणि त्यावर लक्ष दिले पाहिजे. डेंग्यू झाल्यास ताप जास्त वेळ राहतो. तसेच पोटदुखी आणि उलट्या जुलाब यांचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा देखील येऊ शकतो.

 

सर्दी खोकला झाल्यास तुम्हाला निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. निमोनिया हा आजार जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येतो. छातीत कफ जमा झाल्यास छाती जाम होते त्यामुळे निमोनिया होण्याची शक्यता असते. निमोनिया झाल्यास तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. जास्त प्रमाणात थंडी भरून येते. तर काही मुलांना थकवा देखील जाणवतो. निमोनियाचे लक्षणे आधी दिसून येत नाही. सर्दी जास्त प्रमाणात झाल्यास त्याची हळू हळू लक्षणे दिसून येतात. निमोनिया झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच औषध उपचार करा. वेळीच उपचार न केल्यास टीबी होण्याची शक्यता असू शकते.

रेस्पिरेटरी सिंक्टिअल व्हायरस हा फ्ल्यू सारखाच एक व्हायरस आहे. यामध्ये नाक वाहणे तसेच ताप येणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. आरएसव्हीची ही समस्या मुलांमध्ये जास्त दिसून येते आणि त्याचा परिणाम शरीराच्या श्वसनमार्गावर होतो.

हे ही वाचा :

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर आणि आजारांवर ‘हा’ रामबाण उपाय

 

Latest Posts

Don't Miss