Monday, July 1, 2024

Latest Posts

सतत ऍसिडिटी होतेय, छातीत जळजळतय; करून पाहा ‘हा’ उपाय

कधी कधी ॲसिडीटी इतकी जास्त होते की डोकं ठणकतं आणि अस्वस्थ होऊन उलट्या होऊन ती बाहेर पडते. जागरण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव, अपचन, व्यायामाचा अभाव यांमुळे ॲसिडीटी होते. काही जणांची प्रकृतीच पित्ताची असते असे म्हटले जाते

ॲसिडीटी (Acidity) ही अनेकांना नियमितपणे सतावणारी समस्या आहे. ॲसिडीटीमुळे कधी डोके जड होणे, छातीत जळजळणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. कधी कधी ॲसिडीटी इतकी जास्त होते की डोकं ठणकतं आणि अस्वस्थ होऊन उलट्या होऊन ती बाहेर पडते. जागरण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव, अपचन, व्यायामाचा अभाव यांमुळे ॲसिडीटी होते. काही जणांची प्रकृतीच पित्ताची असते असे म्हटले जाते.

ॲसिडीटी झाली की काहीच सुधरत नाही मग आपण जेलोसिल, पॅन डी यांसारखी औषधे घेतो. एखादवेळी अशी औषधे घेणे ठिक असते, मात्र सातत्याने अशी औषधे घेतल्यास आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण होतात. अशावेळी ॲसिडीटी होऊ नये म्हणून घरच्या घरी काही सलग ३ महिने हे उपाय केल्यास ॲसिडीटी कमी होते, आणि आराम मिळण्यास मदत होते. मायग्रेन, पोटाचे त्रास, हार्मोन्सचे (Harmons) संतुलन यामुले टिकून राहते.

पाहूयात घरच्या घरी करता येतील असे हे सोपे उपाय नेमके कसे करायचे…

१.  धण्याचा चहा…

  • १ ग्लास पाण्यात १ चमचा धणे घालायचे.
  • यामध्ये ५ पुदीन्याची पाने आणि
  • १५ कडीपत्त्याची पाने घालायची.
  • हे सगळे मिश्रण ५ मिनीटे गॅसवर चांगले उकळायचे. त्यानंतर हे मिश्रण गाळायचे आणि सकाळी झोपेतून उठल्या, उठल्या चहा घेतो त्याप्रमाणे चहाऐवजी रोज घ्यायचे.

२. बडीशोप…

  • आपण हॉटेलमध्ये गेलो की आवर्जून जेवणानंतर बडीशोप खातो.
  • पण घरात आपण ती खातोच असे नाही.
  • पण प्रत्येक जेवणानंतर बडीशोप खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे अॅसिडीटी बऱ्याच प्रमाणात कमी होते.

३. रोज टी…

  • १ कप पाणी घ्यायचे ते ३ मिनीटे चांगले उकळायचे आणि
  • त्यात गुलाबाची वाळलेली पाने घालून पुन्हा काही वेळ उकळायचे.
  • दररोज झोपण्याआधी अर्धा तास हे पाणी प्यायचे.

४. काळे जिरे..

  • ॲसिडीटीपासून आराम मिळण्यासाठी जिरे थेट चघळावे
  • १ चमचे एक ग्लास पाण्यात उकळून प्यावे.
  • काळे जिरे गॅस्ट्रो-संरक्षणात्मक असतात.
  • ते आम्लता कमी करण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी आहेत आणि
  • छातीत जळजळ, वेदना, मळमळ, सूज येणे, बद्धकोष्ठता इ.

५. बदाम…

  • बदामामध्ये भरपूर पोषक आणि फायबर असतात,
  • जे दोन्ही छातीत जळजळ होण्याचा धोका कमी करण्यास आणि ऍसिड शोषण्यास मदत करतात.
  • याचे कोणतेही ठोस क्लिनिकल पुरावे नसले तरी बदामाचे पौष्टिक प्रोफाइल स्वतःच बोलते.
  • व्यापक अर्थाने, ऍसिडिटीच्या समस्या भूक आणि आहाराशी देखील जोडल्या जातात.
  • बदाम त्यांच्या उच्च पौष्टिक मूल्यामुळे या घटकांचे नियमन करण्यास मदत करू शकतात.

हे ही वाचा

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना.. 

चोपडा बस स्थानकाने पटकावला स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा किताब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss