सतत तहान लागणे शरीरासाठी हानिकारक, जाणून घ्या लक्षणे

सतत तहान लागणे शरीरासाठी परिणामकारक असू शकते.

सतत तहान लागणे शरीरासाठी हानिकारक, जाणून घ्या लक्षणे

सतत तहान लागणे शरीरासाठी परिणामकारक असू शकते. पण काही लोकांना हिवाळा, पावसाळा किंवा उन्हाळा असू दे तहान लागतेच. शरीरासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. पण सारखी सारखी तहान लागणे हे गंभीर आजराचे लक्षण असू शकते. तहाण लागत आहे याचा अर्थ शरीराच्या हालचालीमुळे शरीर अधिक पाण्याची मागणी करत आहे. ज्यामुळे हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. परंतु सतत तहाण लागणे हे चांगली गोष्ट नाही. आतड्यांचा कर्करोग शरीरात खूप हळू वाढतो. त्याची लक्षणे बऱ्याच दिवसांनी दिसतात. आतड्यांच्या कॅन्सरमध्ये अनेक लक्षणे दिसतात. यात, दुखणे, थकवा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे आदींचा समावेश असतो. यामुळे सतत तहान लागणे ही लक्षणे होऊ शकतात.

हे ही वाचा :प्रोटीनयुक्त असणाऱ्या अंड्याचे फायदे

 

विनाकारण पाण्याची तहान लागणे :

किडनी रक्तातील अतिरिक्त साखर फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे ही साखर लघवीद्वारे बाहेर पडते. जास्त लघवीमुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते.

जास्त वेळा तेलकट तिखट खाल्याने अन्न पचत नाही. शरीराला अन्न पचवण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवते आणि हे देखील जास्त तहान लागण्याचे कारण देखील असू शकते.

 

आहारामध्ये काहींजण मिठाचा जास्त वापर करतात. काही जण जेवणावर वरून मीठ घेतात. मिठाचे जास्त प्रमाणात सेवन झाल्यास आपल्याला तहान लागू शकते.

उष्ण आणि दमट हवामानात जास्त घाम येतो. आपले शरीर तापमान संतुलित करण्यासाठी अधिक पाण्याची गरज पडते .यामुळे आपल्यालाही जास्त तहान लागते.

मधुमेहाची समस्या असल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. आणि आपल्यास वारंवार लघवी होते. वारंवार लघवी झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि सारखी सारखी तहान लागते आणि भूक देखील लागते.

हे ही वाचा :

हवाहवाई’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

 

Exit mobile version