बदलत्या ऋतूमुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थाचे सेवन करा

बदलत्या ऋतूमुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थाचे सेवन करा

बदलत्या ऋतूमुळे आपले आरोग्य बिगडू शकते. सध्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी पाऊस पडत आहे. या पावसामुळे हवामानात भरपूर बदल होत चाले आहे. आणि या हवामानाचा बदल आपल्या आरोग्यावर दिसून येत आहे. बदलत्या ऋतूमुळे फ्लू, ताप, टायफॉईड, डायरिया रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. पावसाळ्यात खूप दमट हवामान असते. त्यामुळे या ऋतूत संसर्ग होणारे आजार जास्त असतात. त्यामुळे लोकांनी आहाराची नीट काळजी घेणे फार गरजेचे आहे. ज्या लोकांना हृदय विकाराचा आणि मधुमेहाचा आजार आहे अशा रुग्णांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. रूग्णांनी आपले शरीर हायड्रेटेड ठेवावे. पाणी जास्त प्रमाणात पिणे. त्याच बरोबर जास्त प्रमाणात फळे देखील खाले पाहिजे. बदलत्या ऋतू मध्ये नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करावे या संदर्भात माहिती जाणून घ्या.

हे ही वाचा : नखांची काळजी घेण्याच्या टिप्स: सुंदर आणि लांब नखे मिळविण्यासाठी करा ‘ हे ‘ घरगुती उपाय

 

बदलत्या ऋतूमध्ये काय खावे ? –

ड्रायफ्रूट्स : या ऋतूमध्ये ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. ड्रायफ्रूटमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ड्रायफ्रूटमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्व. खनिजे अशी अनेक पोषक घटक असतात.

हर्बल टी : पावसाळ्यात चहा पिणे अधिक चांगले. जर तुम्ही या ऋतूमध्ये हर्बल टीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य निरोगी राहील. पावसाळ्यात बॅक्टेरियामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. हर्बल टी मध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

गरम पाणी : पावसाळ्यात गरम पाणी पिणे चांगले मानले जाते. कारण पावसाळ्यात नाकातून रक्त वाहणे, खाज येणे यांसारखी सामान्य लक्षणे दिसून येतात. त्यासाठी गरम पाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहे.

 

हिरव्या पालेभाज्या : पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्याचे सेवन करणे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन, आणि भरपूर जीवनसत्त्व असतात. यामुळे शरीरात अनेक वेळ ऊर्जा टिकून राहते.

कडधान्य : आरोग्यासाठी कडधान्य खाणे उपयुक्त आहे. कडधान्यात जीवनसत्त्व, खनिजे, फायबर आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. कडधान्यामुळे हृदयाच्या समस्याही कमी होतात.

हे ही वाचा :

जाणून घ्या तांब्याच्या भांड्यात साठवलेले किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

 

Exit mobile version