बदामाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरावर होतात ‘हे’ दुष्परिणाम

अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी बदाम खातात.

बदामाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरावर होतात ‘हे’ दुष्परिणाम

अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी बदाम खातात. ही गोष्टी खरी आहे. काहीवेळेस डॉक्टर आपल्याला बदाम खाण्याचा सल्ला देतात. पण काही गोष्टी या योग्य प्रमाणातच खाल्ल्या पाहिजेत.लहान मुलांच्या वाढीसाठी त्यांना बदाम दिले जाते. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. मेंदूच्या विकासासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदाम खालले जातात. पण जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यानंतर शरीराला हानी पोहचू शकते. त्याचे काही तोटे सुद्धा आहेत.

जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उच्च फायबरमुळे गॅस आणि पोट फुगणे अश्या समस्या जाणवू लागतात. बदाम खाल्ल्याने शरीरामध्ये उबदारपणा येतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात बदाम खाल्ले तर तुम्हाला ऍलर्जी सुद्धा होऊ शकते. बदामाच्या ऍलर्जीमुळे मळमळ, पुरळ, श्वास घेण्यास त्रास, उच्च रक्तदाब आणि सूज येणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. अतिप्रमाणात बदाम खाल्ल्याने किडनी स्टोनचा जास्त जाणवू लागतो. जास्त प्रमाणात खाल्ले तर ऑक्सलेटची पातळी वाढत जाते. त्यामुळे बदाम योग्य प्रमाणात खालले पाहिजे.

जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्याने व्हिटॅमिन ई ची विषबाधा होऊ शकते. ज्यामुळे अतिसार, पोटात पेटके आणि इतर पाचन समस्यांचा जाणवू लागतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात बदाम खात असाल तर तुमचे वजन ही वाढू शकते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. ज्याने वजन वाढते. बदामामध्ये फायटिक नावाचे ऍसिड असते. जे शरीरातील महत्त्वपूर्ण खनिजे आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास अडथळा आणू शकते. अशा परिस्थितीमध्ये बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅल्शियम, लोह आणि झिंकसारख्या पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.बदाम जर भिजवून खालले तर त्याचा दुप्पट फायदा होऊ शकतो. भिजवून खालले तर त्यामुळे ते पचनाचा सोपे असतात. रात्री पाण्यात भिजवून सकाळी तुम्ही ते खाऊ शकता.

हे ही वाचा:

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यापालांकडे सुपूर्द केला राजीनामा, नव्या सरकारचा शपथविधी आजच होणार

Shivsena Uddhav Thackeray Group: देश हुकूमशाहीच्या वळणावर असताना…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version