पाणी पिल्यानंतर ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास होतील समस्या

पाणी (water) आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला नेहमी सल्ला दिला जातो कि दिवसातून ७ ते ८ वेळा पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरामध्ये पाणी असणे आवश्यक असते आणि भरपूर पाणी पिल्यावर आपल्या शरीरातील आजारांपासून सुटका मिळते.

पाणी पिल्यानंतर ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास होतील समस्या

पाणी (water) आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला नेहमी सल्ला दिला जातो कि दिवसातून ७ ते ८ वेळा पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरामध्ये पाणी असणे आवश्यक असते आणि भरपूर पाणी पिल्यावर आपल्या शरीरातील आजारांपासून सुटका मिळते. पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहे परंतु पाणी हे योग्य वेळी पिणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे असते. अन्नाचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे हे शरीरासाठी योग्य नाही. अन्न खाल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. तसेच जर आपण काही विशिष्ट गोष्टी खाल्यानंतर पाणी पिले तर आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यासाठी पाणी पिल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नये हे जाणून घ्या.

दूध (milk) हे आपल्या शरीरासाठी महत्वाचा घटक आहे. दूध घेल्यानंतर पाणी घेऊ नये कारण त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतात. दुधानंतर पाणी पिल्याने पचनसंस्थेशी निगडित समस्या उद्भवू शकतात. स्ट्राबेरी ही सर्वानाच आवडते आणि तिची आंबट गोड चव ही आपल्या सर्वांच्याच ओळखीची आहे.

स्ट्राबेरी (Strawberry) देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु स्ट्राबेरी खाल्ल्यावर पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी धोक्याचे आहे. स्ट्राबेरीमध्ये नैसर्गिक साखर असते आणि ती जर यीस्ट पाण्यामध्ये मिसळली तर शरीरामध्ये गॅस तयार होऊन त्यामुळे ऍसिडिटी आणि पोटदुखीच्या समस्या उद्भवतात. शेंगदाण्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

शेंगदाण्यांमध्ये (peanuts) तेल आणि फॅट ही (fat)मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. शेंगदाबे खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने आपल्याला सर्दी खोकल्याच्या समस्या उद्भवू शकतात.

सफरचंद (apple) हे तीनही ऋतूमध्ये मिळणारे फळ आहे. सफरचंदामध्ये लोह, जीवनसत्त्वे (Vitamins)आणि फायबर (fiber)यासारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. परंतु सफरचंद खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये सफरचंद खाल्यानंतर पाणी पिल्याने आतड्याना हानी पोहचते. तसेच उन्हाळ्याचा काळ चालू व्हायला काही काळाचा राहिला आहे. त्यानंतर आपल्याला बाजारामध्ये कलिंगड पाहायला मिळतात. आणि आपण उन्हाळ्यामध्ये कलिंगड आणत असतो. परंतु जर आपण कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिल्यावर आपल्या शरीरातील पाचक रस पातळ कमी होतो. कलिंगड खाल्यानंतर पाणी पिल्याने पोट दुखी आणि अपचन सारख्या समस्या उद्भवतात.

हे ही वाचा:

अदानी एन्टरप्राइसेसचा ‘एफपीओ’ रद्द, गुंतवणूकदारांना सर्व पैसे परतवणार

तीच तीच डाळ खाऊन कंटाळा आलाय?, तर बनवा साऊथ इंडियन स्टाईल रस्सम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version