spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घरातल्या खर्चांवर करा नियंत्रण

अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या महत्वाच्या गरजा आहेत. मात्र लाईफस्टाईलच्या गरजेमुळे आपले आर्थिक खर्च वाढत चालले आहेत. त्यामुळे आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च यातला फरक लक्षात न आल्यामुळे अनेकांकडून पैशांची बचत होत नाही. तुम्हाला खर्चाची नोंद ठेवण्यासाठी डायरी ठेवण्याची गरज नाही. फोन मधील नोटपॅडचा देखील तुम्ही वापर करू शकता. घरातील किराणा सामान आणि डाळ, धान्यापासून झाडू, तेल, साबणापर्यंतच्या वस्तू तुम्ही कार्ड वापरून खरेदी करत असाल, तर शक्य झाल्यास ते पहिलं थांबवा. मुळात कार्ड पेमेंट करताना काही प्रमाणात जास्त खर्च होतो आणि कॅश वापरायला सुरुवात केली, की नेमका किती खर्च होतो याचा नीट अंदाज येतो. म्हणूनच कार्ड पेमेंट करण्याची सवय शक्यतो बदलली गेलीच पाहिजे.

हे ही वाचा :

डोळ्याच्या समस्या दूर ठेवण्यासाठी घरगुती उपाय

 

मद्य आणि सिगारेटचे सेवन असल्यास. या सवयी आरोग्यासाठी घातक आहेतच शिवाय अधिक खर्च देखील आहे. काहीजणांची पार्टी दारू-सिगारेटशिवाय पूर्ण होत नाही. सिगारेट-दारूच्या व्यसनासाठी अनेकजण हजारो रुपये खर्च करतात.आणि या खरच्यामुळे महिन्या अखेर आल्यास आपला बजेट हलतो मग घरात वादविवाद होतात. त्यामुळे असे खर्च करणे टाळा.

जेवण किंवा स्नॅक्स करण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी देखील तुम्ही बाहेर जात असाल. पार्टीसाठी हॉटेला वैगेरे जात असाल यामुळे तुमचा आर्थिक खर्च वाढत असेल. जर तुम्हाला आर्थिक खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही बाहेरील खाणे- पिणे टाळा आणि घरगुती जेवण नाश्ता यांचे सेवन करा. ते तुमच्या शरीरासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.

 

शॉपिंगला जायच्या अगोदर तुम्ही आधी बजेट ठरवा आणि त्यानंतर शॉपिंग करायला बाहेर निघा. शॉपिंग करताना तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे त्याच गोष्टीची खरेदी करा. ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या गोष्टीची खरेदी करू नका. शॉपिंगच्या वेळी मोठ्या मोठ्या ब्रॅण्डेड आणि महागड्या वस्तूची खरेदी करू नका.

ऑनलाइन खरेदी करताना नीट विचार करून खरेदी करा. काही वेळी आपण आपल्याला एखादी वस्तू आवडली तर आपण लगेच ऑर्डर करतो मागचा पुढचा विचार न करता पण हे टाळा खर्च करताना तुम्हाला काही गोष्टीचा विचार देखील केला पाहिजे म्हणून खर्च करताना विचार करून खर्च करा.

हे ही वाचा :

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स ठरले ब्रिटनचे नवे राजा

 

Latest Posts

Don't Miss