Copper vessel : हिवाळयात ‘या’ धातूच्या भांडयात पाणी पिणे चांगले की वाईट?

Copper vessel : हिवाळयात ‘या’ धातूच्या भांडयात पाणी पिणे चांगले की वाईट?

थंडीच्या दिवसात तांब्याच्या भांडयात (copper vessel) पाणी पिणे चांगले की वाईट? तांबेच्या भांडीचा वापर आरोग्याशी असतो, पण तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत असे आपण ऐकतो, मात्र थंडीच्या दिवसात तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हे कितपत चांगले आहे कि नाही ? या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसात तांब्याची भांडी वापरल्याने शरीरात थंडी मध्ये होणारे अनेक आजार दूर होतात. पाण्याचा प्रभाव हा गरम आहे. पण जर तुम्ही तांबेच्या भांडयात पाणी वापरल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. म्हणून थंडीच्या दिवसात तांबेच्या भांडयात पाणी पिणे गरजेचे आहे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून हिवाळयात तांबेच्या भांडयात पाणी पिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतील या बद्दल सांगणार आहोत.

हिवाळ्यात अनेक आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागते पण बहुतेक लोक हाडे आणि सांधेदुखीच्या समस्यांना जास्त सामोरे जावे लागते. जर तुम्हाला हाडे आणि सांधेदुखीच्या त्रास होत असेल तर तुम्ही तांबेच्या भांड्यात पाणी पिऊ शकता. तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात. यामुळे हाडे आणि सांधेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

 

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास भरपूर प्रमाणात आढळून येतो. म्हणून सांधेदुखीच्या रुग्णांनी सकाळी लवकर उठून तांबेच्या भांडयात पाणी पियावे. असे केल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो. आणि शरीरातील रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते आणि आजारांच्या अनेक समस्यांना सामोरे देखील जावं लागत नाही. शरीरात लोहाची कमतरता दूर करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात अन्न किंवा पाणी सेवन केल्याने शरीरातील लोहाचे शोषण आणि पेशी तयार होण्यास मदत होते.

तांबेच्या भांडयात पाणी पिल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. कारण तांबेच्या भांड्यात अनेक गुणधर्म आढळून येतात, आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील सुधारते.

तसेच तांबेच्या भांड्यात पाणी पिल्याने त्वचेचे देखील आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते. तसेच तांब्याच्या भांड्यात दुधजन्य आणि आंबट पदार्थ सेवन करू नये.

हे ही वाचा : 

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

 

 

Exit mobile version