मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा आपण आपल्याकडे लक्ष देणे कमी करतो. याचा परिणाम हा फार दूरगामी होतो. या दैनंदिन जीवनात स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला काही आजार हे सुरुवातीला अगदीच चुटे समजतो. पण ते पुढे जाऊन प्रचंड त्रासदायक ठरू शकतात. यासाठी स्वतः कडे लक्ष देणं फार गरजेचे आहे.
- हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. असे केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो. खोकला बरा होतो.
- आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो.
- लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात ॲन्टीबॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो व बरं वाटतं.
- काळे मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
- पिंपळी गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.
- खोकला बरा होत नसेल, तर नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातीला मालिश करा, याने कफ मोकळा होतो व बरं वाटते.
- ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली की, ज्येष्ठमध काडी चघळल्यास ढास जाते, बरं वाटते, किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
- पुदिना पाने व तुळस . या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहेत. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले की एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ मोकळा होतो व बरं वाटतं.
- लवंग व मध खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते. झोप लागत नाही. अशा वेळी पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात.
- सर्दी व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा. संक्रमण दूर होतील
- खोकला बरा होत नसेल, तर चार वेलदोडे व तितकीच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
- नुसती कोरडी ढास लागली असेल, तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या. पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
- सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धणे व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे, आटवून अर्धा करा. मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.
- खोकला, कफ, सर्दी वर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.
- खोकल्यावर सुंठीची पावडर अर्धा चमचा + पिंपळी चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
- खोकला झाल्यास बडीशेप व खडीसाखर खावी.
- एक चिमूटभर काताची पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.
- खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच, सहा मनुका घालून खावे.
- खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावी.
- खोकला बरा होत नसेल, तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन, चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.
- कोरडा खोकला झाल्यास खसखशीची खीर खावी. मुठभर खसखस तुपात भाजून घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्या. साखर आवडीनुसार मिसळून घ्यावे.
- डांग्या खोकल्यावर तुरटी कुटून गरम करून घ्या. मग त्या त्या पाणी मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटी शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.
- तिळाचे तेल कोमट करून प्यावे.
- बकुळीची फुले ओंजळभर + सोनचाफ्याची ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.
- अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.
- एक कप दूधामध्ये लसणाच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.
- ज्येष्ठ मध + खडीसाखर चघळावी.
- कोरफडीची पाने भाजून घ्या, त्यांचा रस काढून घ्यावा, एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे.
- भिमसेन कापूर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
- खोकला झाल्यास तुळशीची पाने ठेचून व गरम करून या पोटीसने छाती शेकावी .
हे ही वाचा :
लष्करप्रमुखपदी GENERAL UPENDRA DWIVEDI यांची लागली वर्णी
Follow Us