spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय पर्यटकांना कमी बजेटमध्ये फिरता येतील असे देश…

भारता व्यतिरिक्त जगात अशीही काही ठिकाणं आहेत, जिथे अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही फिरू शकता.

फिरायला जायला कुणाला आवडत नाही. आपलं रूटीन सोडून काहीतरी वेगळं करता यावं आणि मनमोकळेपणाने चार क्षण कुठेतरी भटकता यावं म्हणून अनेकजण कुठे ना कुठे फिरायला जायचं प्लॅनिंग करत असतात. एकवेळ स्वतःच्याच देशात म्हणजे भारतात फिरताना आपण फार चिंता नाही करत किंवा कुठे फिरायला जावं यावर फार चर्चा करत बसत नाही. पण, हेच प्लॅनिंग परदेशात फिरायला जायचं असेल तर? कुठेतरी आपण थांबतो, विचार करतो आणि महत्वाचं म्हणजे खर्च किती येईल? आपलं बजेट आहे का तेवढं? याचा जरा बारकाईनेच विचार करू लागतो. पण, तुम्हाला माहितीये का? की जगात अशीही काही ठिकाणं आहेत, जिथे अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही फिरू शकता.

 

Thailand
Thailand

थायलंड : थायलंड हा प्रत्येकाच्या बजेटला अनुकूल ठरेल पर्यटन स्थळ ठरलेला, जगातील 20व्या क्रमकांचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. या देशातील मैत्रीपूर्ण वातावरणामुळे इथे फिरणे अजूनच सोपे जाते. सिटी पार्टीजसाठी प्रसिद्ध असलेले बँकॉक शहर, नाईटलाइफसाठी प्रसिद्ध असलेले पट्टाया, माउंटन ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले चियांग राय आणि सुंदर प्राचीन समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले कोह सामुई आणि क्राबी शहर ही थायलंडमधील काही पाहण्याजोगी ठिकाणं आहेत.

 

Bhutan
Bhutan

भूतान : भारतातून भेट देण्यासाठी भूतान हा सर्वात स्वस्त देशांपैकी एक आहे. विविध प्रकारच्या खोल अशा दऱ्यांपासून ते भव्य मठांपर्यंत, येथे पाहण्यासारखे बरेच काही आहे. या देशाचे मुख्य आकर्षण म्हणजे अगदी उंचावर वसलेला तक्तसांग मठ.

 

Sri Lanka
Sri Lanka

श्रीलंका : मंत्रमुग्ध समुद्रकिनारे, विलक्षण ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, हिल स्टेशन्स, गजबजणारी शहरे आणि तोंडाला पाणी आणणारे सीफूड या गोष्टींनी परिपूर्ण असा देश म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेतील कोलंबो आणि नेगोंबो या शहरातील सिटी लाईफ तर थंड हवामान, चहाचे मळे आणि धबधबे यांनी मोहित करणारे नुवारा एलिया आणि कॅंडी ही श्रीलंकेतील ठिकाणे अगदीच भेट देण्याजोगी आहेत.

 

Nepal
Nepal

नेपाळ : नेपाळ भारताच्या अगदी शेजारचा आणि भारताचा मित्र म्हणवला जाणारा एक देश. या देशातील विलोभनीय परिसर आणि सुंदर लँडस्केप्समुळे येथील ठिकाण ही ट्रेकसचा स्वर्ग म्हणवला जातो. नेपाळ हा भारतातून भेट देण्यासाठी सर्वात स्वस्त देशांपैकी एक आहे. त्याचबरोबर, तेथील भव्य मठांमुळे नेपाळशी आणि तिथल्या संस्कृतीशी अध्यात्मिक स्तरावर पर्यटकांना छान कनेक्ट होता येतं.

Latest Posts

Don't Miss