अशा पद्धतीने करा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार

अशा पद्धतीने करा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे हा एक चांगला पर्याय आहे. सण म्हटले की आपण खूप शॉपिंग करतो आणि पैसे वाया घालवतो. सध्या आता सणांचे दिवस आहेत. त्यामुळे आपण घरात वेगळी वेगळी सजावट करतो. तसेच काही लोकांना जुन्या वस्तू जपून ठेवण्याची सवय असते. जुन्या वस्तूंपासून आपण बऱ्याच वस्तू किंवा सजावटीसाठी काही गोष्टी बनवू शकतो. जुन्या वस्तू घरात जपून ठेवल्यास आपल्या काही जुन्या आठवणी जाग्या होतात. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे हा पर्याय आपल्याला पर्यावरण खराब करण्यापासून वाचवू शकतो. वस्तू वापरल्यानंतरही न टाकता आपण त्याला कसे नवे रूप, आकार देवु शकतो , आणि त्याचा परत वापर करून घेऊ शकतो, यावर एक नजर टाकुया:

हे ही वाचा : काकडी खाण्याचे फायदे

 

आईस्क्रीमच्या काड्यांपासून वस्तू बनवणे – आईस्क्रीम खाण्यापासून आपण स्वतःला आणि लहान मुलांना देखील थांबू शकत नाही. पण आईस्क्रीमच्या काडयांपासुन आपण बऱ्याचश्या गोष्टी बनवू शकतो. आईस्क्रिमच्या काडयांचे शोपिस, आईस्क्रिम काडयांचा फलॉवरपॉट देखील बनवू शकतो.

माचीसच्या काड्यांपासून वस्तू बनवणे – आपल्या रोजच्या जीवनात काडीपेटीचा वापर तर होतोच , आणि आपण ती जाळून फेकून देतो. त्याच काडी पासून आपण काडीपेटीचे शोपिस किंवा पेन पेन्सिल ठेवण्यासाठी ग्लास बनवू शकतो.

 

जुन्या मुलांच्या कपड्यापासून कापडी पिशवी बनवणे – तसेच आपण मुलांचे जुने कपडे फेकून देतो किंवा अनाथ आश्रमामध्ये देतो. तर तुम्ही मुलांच्या कपड्यांपासून कापडी पिशवी बनवू शकता.

जुन्या बांगड्यापासून शोपीस बनवणे – आपण जुन्या बांगड्या काढून ठेवतो. आणि नव्या बांगड्या घालतो तसेच आपण साडी किंवा ड्रेसनुसार बांगड्या घालत असतो. त्यामुळे जुन्या बांगड्या तशाच पडून असतात तर तुम्ही त्याच बांगड्यांपासून शोपीस देखील बनवू शकता.

प्लॅस्टिकच्या बाटली पासून तुम्ही पेन्सिलसाठी डबा किंवा बर्ड फीडर देखील करू तयार करू शकता.

हे ही वाचा : 

सणासुदी मध्ये पैशाची बचत कशी कराल

 

Exit mobile version