spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी करा घरगुती उपाय

सुरकुत्या कमी करण्यासाठी वेळेवर आहार आणि झोपणे फार गरजेचे आहे

त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी लोक खूप काही उपाय करतात. त्वचेचा समस्या या कोणत्याही वयात आढळतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही घरगुती फेसपॅकही बनवू शकता. सुरकुत्या असल्यास त्वचा कोरडी पडते. सुरकुत्या कमी करण्यासाठी वेळेवर आहार आणि झोपणे फार गरजेचे आहे. काहीजण सुरकुत्या जाण्यासाठी एन्टी एजिंग क्रीमचा वापर करतात. तुम्ही खूप तणावाखाली आहात का? तर आज आम्ही सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत.

कोरफड आणि अंडी – कोरफडीचे फायदे अनेक असून त्यात व्हिटॅमिन ई चे नैसर्गिक गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा ओढली जाऊन सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कोरफड व अंड्याचा मिश्रणामुळे तुमची डेड स्क्रीन निघून जाते आणि त्वचा चमकदार दिसू लागते. कोरफडीचा रस आणि अंड्याचा वरचा भाग मिक्स करून चेहऱ्यावर लावणे आणि १५ मिनटे लावून ठेवणे. त्याने त्वचा सुंदर आणि मुलायम दिसते.

पपई – सुरकुत्यांसाठी पपईचा आपण फेस पॅक बनवून चेहेऱ्यावर लावू शकतो. पपईचा गर मिक्सरमध्ये वाटून घेऊन मग तो १० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवणे.

नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल – नारळाचे तेल अनेक समस्यांवर गुणकारी आहे. नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करा आणि त्वचेवर झोपण्यापूर्वी लावून अलगतपणे लावून घ्या. म्हणजे रात्रभर तेल तुमच्या त्वचेत मुरेल.

तांदळाचे पिट आणि दूध – तांदळाच्या पीठामध्ये दूध मिक्स करून ते सुद्धा चेहेऱ्यावर लावू शकता.

बटाटा – बटाटा मिक्सर मध्ये वाटून त्याचा रस काडून घ्या आणि चेहऱ्यावर लावा म्हणजे चेहरा मऊ दिसेल.

हे ही वाचा:

चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, उद्धव ठाकरे हे आजकाल जे काही बोलतात ते फर्स्ट्रेशनमधून येतंय

बाप्पाच्या विसर्जनामागचं नेमकं लॉजिक काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss