अनेकांना रडवणाऱ्या कांद्याचे आणि त्याच्या रसाचे फायदे माहीत आहेत का ?

अनेकांना रडवणाऱ्या कांद्याचे आणि त्याच्या रसाचे फायदे माहीत आहेत का ?

कांदा हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. कोणत्याही भाजीमध्ये चव आणायची असेल किंवा मस्त तडका द्यायचा असेल तर कांद्याशिवाय जेवणाला मजा नाही. आहारासोबतच कांदा आपण सॅलेडप्रमाणे किंवा जेवणासोबत तोंडी कच्चा खातो. परंतु, कांद्याची ही खासियत जेवणात चव आणण्यापुरतीच मर्यादित नाही. सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर त्या दृष्टीनेही कांद्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग त्वचा आणि केसांसाठी कांद्याचे आणि कांद्याच्या रसाचे विविध फायदे आपण जाणून घेऊयात..

केसांसाठी आणि त्वचेसाठी कांद्याचा रस अतिशय फायदेशीर मानला जातो. कांदा खाल्ल्याने आपले आरोग्य सुधारते. तसेच, कांद्याचा रस आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय लाभदायी मानला जातो. कांद्याचे इतर अनेक फायदे ही आहेत.

कांद्यामध्ये सल्फर, व्हिटॅमिन C,व्हिटॅमिन B6 आणि पोटॅशिअम असते ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

 

कांद्याचे पाणी फक्त शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठीच फायदेशीर नाही तर त्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात. कांद्यामध्ये असलेले सल्फाइट, सल्फोक्साइड आणि थायोसल्फेट गुणधर्म तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. कांद्याचा रस नियमित प्यायल्याने तुमच्या आरोग्यासाठी हे फायदे होतात.

कावीळ हा दुषित पाणी आणि आहारातील गडबडीमुळे होतो. कावीळीच्या समस्येवर कांद्याचे पाणी नियमित पिणे खूप फायदेशीर आहे. कांद्याच्या पाण्यात व्हिनेगर किंवा आवळ्याचा रस मिसळून प्यायल्यास काविळीच्या समस्येवर फायदा होतो. काविळीतही कांदा खाणे फायदेशीर मानले जाते.

कांद्याचा रस केसांना वेळेआधी पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतो. त्यामध्ये उपस्थित असलेल्या कॅटालिस नावाचे एंजाइम सफेद केसांना काळे करते आणि अकाली पांढरे होणाऱ्या प्रक्रियेस ब्रेक लावते. याशिवाय कांद्याचा रस केसांतील कोंडाची समस्याही संपवते. एका वाडग्यात कांद्याचा रस काढून टाळूवर मालिश करा आणि अर्धा तास ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. कांद्याचा वास दूर करण्यासाठी सौम्य शॅम्पूने केस धुवा.

जर कांद्याचा रस लसणाच्या रसात मिसळला तर मुरुमांच्या समस्येमध्ये बराच आराम मिळतो. कांद्यामध्ये जीवनसत्त्वे आणि लसूणमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. कांदा आणि लसूण दोन्ही रस समान प्रमाणात मिसळा आणि सुमारे २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. यानंतर तोंड धुवा.

इतर भाज्यांच्या तुलनेत कांदा हा शरीरारासाठी फायदेशीर असतो, कारण यातील फायबर उपयुक्त ठरतो. पण अति प्रमाणात कांदा खाल्ल्यावर पोट दुखीचा त्रास संभवतो. त्यामुळे कांद्याचा वापर प्रमाणात करा

हे ही वाचा : 

महिलांसाठी उपयोगी असलेले काही खास योगासने

 

 

Exit mobile version