पपईसोबत चुकून ही फळे खाऊ नका, नाहीतर होऊ शकतो गंभीर आजार

पपईसोबत चुकून ही फळे खाऊ नका, नाहीतर होऊ शकतो गंभीर आजार

पपई हे फळ सर्वांचेच आवडते फळ आहे. पपई आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, ए , इ , बी, प्रोटीन आणि डायटरी फायबरसारखे अनेक पोषक घटक आढळतात . पपईचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे . पपई खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पपई आरोग्यासोबत देखील त्वचेला ही उत्तम आहे . पपई नियमितपणे खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते . पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. तसेच पपई सोबत कोणतेही फळ खाऊ नका कारण वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते . एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये १२० कॅलरीज असतात. कारण पपईमुळे पचन व्यवस्था सुधारते.

हे ही वाचा : सतत उचक्या का लागतात ? उचक्या थांबविण्यासाठी काही उपाय

 

पपई आणि लिंबाचे सेवन एकत्र करू नये . जर तुम्ही सॅलड मध्ये पपई खात असाल तर लिंबाचे सेवन करू नका. कारण लिंब आणि पपई एकत्र खाल्याने
ऍनिमिया सारखा त्रास होऊ शकतो. पपई खाल्ल्यानंतर काही तासांनीच लिंबाचा पदार्थ खा .

टोमॅटो, संत्री, मोसंबी , चिंच , कैईरी अशी आंबट फळे पपई सोबत खाऊ नये. कारण या फळांचा आंबटपणा आणि पपईचा गोडवा यांतून तयार होणार टॉक्सिन आरोग्यासाठी चांगले नसते . त्यासाठी पपई सोबत कोणतेही फळे खाण्याचा अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . पपई खाण्याच्या अगोदर आंबट पदार्थ खाऊ नये .

 

पपई सोबत केळी खाऊ नये . पपई आणि केळी एकत्र खाणे हे पचनसंस्थेवर अवलंबून असते . काहीजणांची पचनशक्ती कमजोर असते . त्यामुळे पपई आणि केळी एकत्र खाल्यास अपचन, उलट्या, मळमळ, गॅस आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या होऊ शकतात .

पपई आणि दही कधीच एकत्र खाऊ नये. पपई हे फळ गरम आहे तर दही थंड आहे. त्यामुळे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर, पोटासाठी हानिकारक ठरू शकते .

याबरोबरच पपई जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. पपईमध्ये असणाऱ्या पॅपिन या एन्झाईममुळे ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सूज येणे, त्वचेवर रॅशेस येणे, गरगरल्यासारखे होणे, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

हे ही वाचा :

थायरॉईड नियंत्रणात आण्यासाठी घरगुती उपाय

 

Exit mobile version