मलेरिया झाल्यास चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका

मलेरिया झाल्यास चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका

मलेरिया हा आजार मच्छर चावल्याने होतो . आजकाल मच्छरचे प्रमाण वाढत चाले आहे . या आजारावर वेळीच उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याचाही धोका असू शकतो. मच्छर चावल्याने तुमच्या शरीरात विषाणूचा शिरकाव होतो . हा विषाणू शरीरातील रक्तातील पेशींवर हल्ला करण्यास सुरुवात करतो . या आजारामध्ये थंडी वाजून ताप येतो . ताप सहसा दुपारनंतर येतो. मलेरिया झाल्यास आरोग्याची काळजी घेतली पाहिजे . या आजारामध्ये तेलकट पदार्थ खाऊ नये . मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते.

हे ही वाचा : शांत झोप लागण्यासाठी करा हे उपाय

 

मलेरिया होण्याची लक्षणे –

– थंडी वाजून ताप येतो.

– ताप सहसा दुपारनंतर येतो.

– तापाबरोबर खूप डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी जाणवते .

– विष्ठेमधून रक्त येणे.

 

मलेरिया झाल्यास या गोष्टी खाऊ नये –

मलेरियाची लागण झाल्यास थंड पाणी अजिबात पिऊ नका किंवा थंड पाण्याने अंघोळ करू नका. मलेरियाच्या रुग्णांनी आंबा, डाळिंब, लिची, अननस, संत्री किंवा लिंबू ही फळे खाऊ नये. दही, गाजर, मुळा यांसारख्या थंड पदार्थांचे सेवन टाळा. तिखट-मसाले किंवा आम्ल युक्त पदार्थ खाणे टाळा. बाहेरचे तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा .

मलेरियापासून वाचण्यासाठी या गोष्टी कराव्या –

घरात डास होऊ देऊ नका. यासाठी आपल्या सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणे . साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे घराजवळील नाले साफ करा. पाणी साचू नये म्हणून घराबाहेरील खड्डे बुजवा . घरामध्ये आणि घराबाहेर प्रत्येक कोपऱ्यात वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करा. डासांपासून संरक्षण होण्यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला. डास चावू नये म्हणून अंगावर क्रिम लावणे किंवा मच्छरदाणी वापरणे . संध्याकाळच्या वेळेस दरवाजे, खिडक्या बंद ठेवा. मलेरियाचा ताप कमी करण्यासाठी ३,४ काळीमिरी आणि कांद्याचा रस काढा. दिवसातून दोन-तीनदा तो रस प्या.

हे ही वाचा :

थायरॉईड नियंत्रणात आण्यासाठी घरगुती उपाय

 

Exit mobile version