या’ पदार्थाचे सेवन करून नये, वात वाढण्यास मदत होते…

या’ पदार्थाचे सेवन करून नये, वात वाढण्यास मदत होते…

वात ही समस्या ठीक करण्यासाठी बहुतेक जण आयुर्वेद औषधाचा वापर करतात. तरीही वात ही समस्या ठीक होत नाही. चुकीची जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे या सारख्या समस्या उद्भवतात. पण वात ही समस्या जास्त करून ज्येष्ठांमध्ये जास्त दिसून येतात. साधारणपणे वृद्धापकाळात हाडांची ठिसुळता, मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, डोळ्यांचा अशक्तपणा कानाचे आणि श्वसनाचा त्रास, हृदयविकार, वात या सारखे आजार दिसून येतात. त्यामुळे योग्य वयात शरीराची काळजी घेणे फार गरजेचे असते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून कोणत्या पदार्थाचे सेवन केल्याने वात वाढण्यास मदत होते हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

हे ही वाचा : मधुमेहाच्या रुग्णांसाठी घरीच तयार करा शुगर फ्री लाडू…

 

वात वाढल्यास काय होते –

शरीरात हवेचं प्रमाण वाढलं की अधिक वात तयार होतो.
पोट फुगणे
अंग दुखी
अस्वस्थ वाटणे
शरीराच्या कोणत्याही भागात सुन्नपणा
तणाव
चुकीची जीवनशैली
पुरेशी झोप न मिळणे

वात असल्यास थंड पदार्थाचे सेवन करू नये. कारण थंड पदार्थामुळे वात वाढण्यास मदत होईल.

सुखलेल्या भाज्या जास्त प्रमाणात खाऊ नये. कारण सुखलेल्या भाज्यांमधील पोषक तत्वे निघुन जातात. आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

सुके मासे खाणे सर्वांना आवडते. पण सुखे मासे खाऊ नये. कारण त्यात देखील कोरडेपणा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे देखील वाट वाढण्यास मदत होते. वात वाढू नये म्हणून शरीरात ओलावा असणे फार गरजेचे आहे. त्यासाठी जास्त प्रमाणात पाणी पिणे.

 

जास्त प्रमाणात कोणतेही पदार्थ खाऊ नये. कारण जास्त प्रमाणात पदार्थ खाल्याने ते पचनास जड जाते. त्यामुळे देखील वात वाढण्यास मदत होते.

तुरट-तिखट- कडू अशा चवी आपल्याला कितीही आवडल्या तरी देखील वात असणाऱ्यांनी या गोष्टी टाळलेल्या बऱ्या असतात. कारण त्यामुळेही वात जास्त प्रमाणात वाढते.

वांगी , तूर, वाटाणे, मटार, पावटे हे चवीला आणि आरोग्यासाठी कितीही पोषक असले तरी देखील ते वात असणाऱ्यांसाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे याचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे.

हे ही वाचा : 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार श्रीरामाचे राज्याभिषेक; रामनगरीत दीपोत्सव साजरा करणार

 

Exit mobile version