spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कारल्याची भाजी खाल्यावर हे पदार्थ मुळीच खाऊ नका! आरोग्यावर होईल मोठा दुष्परिणाम…

अनेक लोकांना जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर दही खाण्याची सवय असते. पण जर कारल्याच्या भाजीसोबत दह्याचं सेवन केलं तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

कारल्याची भाजी अनेक लोकांना आवडत नाही. ताटात कारल्याची भाजी आली की अनेक लोक नाकं मुरडतात. कारल्याची भाजी चवीला कडू असल्यामुळे अनेक लोक या भाजीचे सेवन करण्यास टाळा टाळ करतात. परंतु या भाजीचा चाहतावर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे. कारल्याची भाजी ज्यांना आवडते ते लोक आवडीने ही भाजी खातात. तसेच या भाजीचे आपल्या आरोग्यावर अनेक फायदे होतात. डायबिटिसच्या  (diabetes) रुग्णांसाठी कारलं प्रचंड फायदेशीर असतं. कारल्याचे सेवन केल्याने पोटासंबंधी अनेक समस्या लगेच दूर होतात. परंतु कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे अनेकांना माहीत नसतं. कारलं खाल्ल्यावर काही पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये…

दूध

कारल्याचं सेवन केल्यानंतर दुधाचं सेवन चुकूनही करू नये. असं केलं तर पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारले खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता (Constipation), पोटात वेदना (Stomach pain) आणि जळजळ (inflammation) अशा समस्या होतात. जर तुम्हाला आधीच पोटासंबंधी समस्या असेल तर तुमच्या अडचणीत आणखीन वाढ होऊ शकते.

मूळा

कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर मूळा किंवा मूळ्यापासून तयार कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नये. असं केल्याने तुम्हाला शरीरासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचं कारण मूळा आणि कारल्याचे गुण वेगवेगळे असतात. ज्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी (Acidity) आणि घशात कफ (Phlegm in the throat) अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे कारलं खाल्ल्यानंतर मूळा अजिबात खाऊ नये.

दही –

अनेक लोकांना जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर दही खाण्याची सवय असते. पण जर कारल्याच्या भाजीसोबत दह्याचं सेवन केलं तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर दह्याचं सेवन केलं तर तुम्हाला त्वचेसंबंधी समस्येचा सामना करावा लागू शकतो.

हे ही वाचा:

ओट्स आणि मूगडाळी पासून बनवा गोड, चविष्ट आणि हेल्दी Dahiwada!

Makhana Dosa कधी ट्राय केला आहे का? नसेल तर आता नक्कीच ट्राय करा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss