spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Hair Tips केस धुण्यासाठी करू नका गरम पाण्याचा वापर

आजकाल केस गळतीची समस्या खूप वाढताना दिसत आहे. बहुतेक लोक केस धुताना गरम पाण्याचा वापर करतात. पण असे करू नये असे केल्याने केसगळती जास्त प्रमाणात वाढते आणि त्यामुळे केसात कोंडा देखील होतो. केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. केसांमुळे त्वचेला सुंदरता मिळते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये या बद्दल सांगणार आहोत.

तसेच हिवाळ्यात केस गळती होणे ही सामान्य बाब झाली आहे. वातावरणात बद्दल झाली की त्याचे परिणाम केसांवरील त्वचेवर दिसून येतात. हिवाळयात थंड पाण्याने अंघोळ करण्याची इच्छा कोणाला होत नाही. बहुतेक लोक थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करतात. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील थंडी जाते पण बहुतेक लोक केस देखील गरम पाण्याने धूवुतात आणि त्याचा केसांवर खूप वाईट परिणाम होतो. गरम पाण्यामुळे स्कीनला त्रास होतो. स्कीन ड्राय (Skin dry) होते. हिवाळयात केसांची काळजी घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात केस कोरडी होतात. त्यामुळे हिवाळ्यात केस धुताना गरम पाण्याचा वापर करू नका. केस धुण्यासाठी कोमट गरम पाण्याचा वापर करा. कोमट गरम पाण्याचा वापर केल्याने केसांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.

 

केस जर जास्त कोरडी झाली तर त्याला कंडिशनर वापरणे आणि साध्या पाण्याने केस धुवून घेणे. हिवाळयात केस धुवून झाल्यानंतर कंडिशनर वापरणे यामुळे केसांना चमक येते.

केस धुतल्यानंतर टॉवेलने केसांना सुकवू नका. त्यामुळे केसांवर हानिकारक परिणाम होऊ शकतात. म्हणून केसांना नीट टॉवेल गुंडाळून घ्या. गरम पाण्याने अंघोळ केल्याने केसानमधील कोंडा वाढण्यास मदत होते.

गरम पाण्याने केस धुतल्यास केस गळती जास्त प्रमाणात होते, केस गळती थांबवण्यासाठी खोबरेल तेल (coconut oil for hair) तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच तुम्ही केसगळतीसाठी खोबरेल तेल आणि कढीपत्ता याचा वापर करू शकता. हे दोन्ही केसांसाठी खूप फायदेशीर असतात. कढीपत्यात असलेले पोषक घटक केसगळती थांबण्यास मदत करते. खोबरेल तेल थोडे गरम करून घ्या आणि त्यामध्ये कढीपत्ता मिक्स करून घ्या आणि ते मिश्रण केसांना लावा आणि चांगला मसाज करून घ्या, असे केल्याने केसगळती थांबण्यास मदत होते.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss