spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केस गळतीची समस्या असेल तर करा हे घरगुती उपाय

केस गळतीमुळे फक्त तुमचं डोकंच नव्हे तर तुमच्या शरीरावरही मोठा परिणाम होतो. केसगळतीमुळे आपल्याला अनेक समस्याला सामोरे जावे लागते . टक्कल किंवा Baldness म्हणजे डोक्यावरील मोठ्या प्रमाणात केस गळती असे समजले जाते. वाढत्या वयाबरोबर अनुवांशिक समस्यांमुळेही केसांची गळती हे सामान्य कारण आहे. कोणालाही ही केसगळतीची समस्या उद्भवू शकते. केसगळती थांबवण्यासाठी करा हे घगूती उपाय .

हे ही वाचा : मिठाचे पाणी पियाल्याने आरोग्यास हे लाभदायक फायदे होऊ शकतात

 

केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी उपाय –

गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.

खोबरेल तेलात थायम ऑइल मिसळून डोक्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते. यामुळे केसांची चांगली वाढ होते. हे तेल डोक्यावर जमा झालेली घाण कमी करते . पण हे तेल जर तुम्हाला गरज भासत असेल तरच तुम्ही लावा .

रोज सकाळी खोबरे तेल लावणे .

केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही बदाम आवळ्याचे तेल देखील वापरू शकता .

डोक्यात डैंड्रफ असल्याने देखील केसगळती होते . डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.

ओल्या केसांना रगडून पुसू नका. हलक्या हाताने केस पुसा आणि केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा .

 

पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा.

केसांच्या मुळांना जास्वदींचे तेल लावल्यास केसांना बळकटी येते . जर आपण या जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश केली, तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात. नवीन केसही येतात . आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस, या तेलाने नक्कीच मालिश करा. केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथी दाणे शिजवू ठेवा.

केस गळती कमी होण्यासाठी तुम्ही कांदयाचा रसामध्ये मध मीकरून लावू शकता . आपल्या केसांच्या लांबीनुसार कांद्याचा रस घ्यावा. यामध्ये एक ते दोन चमचे मध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळूसह संपूर्ण केसांवर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि केसांची वाढ देखील चांगली होईल.

हे ही वाचा :

.. तुम्ही भाताचे सेवन करतात ? मग ही बातमी नक्की वाचा

 

Latest Posts

Don't Miss