तोंडाच्या दुर्गंधी पासून त्रस्त आहात तर करा हे उपाय

तोंडाच्या दुर्गंधी पासून त्रस्त आहात तर करा हे उपाय

आपण कितीही सुंदर दिसत असलो तरीही जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर लोक आपल्या पासून लांबच नाही तर बोलणे देखील टाळतात. ब्रश न केल्याने अनेकांना हिरड्या संबंधित समस्या उद्भवतात असतात. तसेच अनेक काही सामान्य कारणे देखील आहेत ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून तोंडातून दुर्गंधी का येते ? त्यावर घरगुती उपाय कोणते ? या बद्दल सांगणार आहोत.

चहा कॉफी किंवा कांदा याचे सेवन केल्याने तोंडातून घाण दुर्गंधी येऊ लागते. तुम्ही जर जास्त प्रमाणात चहा, कॉफी, कांदा किंवा लसणाचे सेवन केले तर तोंडातून घाण दुर्गंधी येण्यास मदत होईल. तोंडातील दुर्गंधी येण्याचे दुसरे कारण म्हणजे आजकालची खराब जीवनशैली. तुमची जीवनशैली चांगली नसेल म्हणजे झोपण्याची किंवा उठण्याची वेळ यामुळे देखील तोंडातून घाण वास येऊ शकतो.

 

अनेक लोक तोंडातून दुर्गंधी येण्यापासून त्रस्त आहेत. आपण रोजच्या आहारात जे पदार्थ सेवन करतो त्यामुळे देखील तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू शकते. अशा वेळी गोड खाणे टाळावे आणि चहा कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करावे. त्याच बरोबर जंक फुडचे सेवन देखील बंद करणे. यामुळे तोंडातून दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

आपण कोणत्याही प्रकारचे पदार्थ सेवन करतो. पण पदार्थ सेवन केल्यानंतर आपण कमी प्रमाणात पाणीचे सेवन करतो. पण कोणत्याही प्रकारचे पदार्थ सेवन करताना आपण जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे असे केल्याने तोंडातील घाण दूर होतो.

दातांची स्वच्छता चांगली असूनही तोंडातून दुर्गंधी येत राहते. याचे कारण तुमची जीभ देखील असू शकते. बहुतेक लोक धूम्रपान करतात त्याचा अतिवापर केल्याने देखील दुर्गंधी येऊ शकते म्हणून धूम्रपान करणे टाळणे.

तुळशीची पाने खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते. तोंडात बडीशेप ठेऊन चघळल्याने तोंडातून येणारी दुर्गंधी कमी होऊ शकतो.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version