spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण…

सतत काम करत असल्यामुळे आपलं शरीर तर थकतेच त्याचबरोबर आपला मेंदूही थकतो. कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला एकाग्रता खूप महत्वाची असते. मेंदू थकला की आपल्याला कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. मेंदूची देखील काम करण्याची एक विशिष्ट मर्यादा आहे. पण सततच्या कामामुळे काही वेळानी मानसिक भर पडल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे मेंदू थकायला लागतो आणि या थकव्यामुळे कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. हा ताण कसा ओळखायचा आणि कसा थांबवायचे ते जाणून घेऊया.

शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कोणतेही काम करण्यासाठी एकग्रता फार महत्वाची असते. कारण शरीराच्या सर्व अवयवांप्रमाणेच मेंदूचीही कार्य करण्याची क्षमता मर्यादित असते. पण सततच्या कामामुळे काही वेळाने मानसिक भार पडल्यासाखरे वाटू लागते. त्यामुळे मन थकायला लागले की या थकव्यामूळे कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये समतोल राखावा लागतो. मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असले तरच काम सुरळीत होऊ शकते. पण ज्यावेळी आपण हा समतोल राखू शकत नाही आणि मेंदूकडून जास्त काम घेतो तेव्हा मात्र माणूस थकतो. हा थकवा कसा दूर करायचा ते जाणून घेऊया.

आज काल सर्वचजण आपला बराच वेळ हा सोशल मीडियावर घालवताना दिसतो. त्यामुळे ह्या गोष्टींचा मर्यादित वापर केला पाहिजे. तुम्ही सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहून इतरांच्या जीवनाची तुलना तुमच्या स्वतःशी करू लागता. ह्या गोष्टीचा दबाव तुमच्या मनावर येतो. तुम्ही स्क्रिनसमोर जितका जास्त वेळ घालवता तितका तुमचा मेंदू सक्रिय राहतो. त्यामुळे तुमच्या मेंदूला थकवा जाणवू लागतो. म्हणून तुमचे काम संपले कि तुमचा फोन बाजूला ठेवा आणि स्वतःला अश्या काही काम मध्ये गुंतून घ्या ज्यामुळे तुमचा मेंदू आणि मूड फ्रेश होईल. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर थांबवलाच पाहिजे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss