८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

अपुऱ्या पोषक्ततवांमुळे शरीरात कायम थकवा जाणवतो. थकव्याची कायम हीच लक्षणे असतील अस नाही. कधी कधी शरीरात गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकतात. आजारांना कधीच दुर्लक्ष करु नये. लगेच त्या आजारांवर ताबडतोब औषध उपचार केले पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून काही आजारांची लक्षणे सांगणार आहोत.

हे ही वाचा : दुधी भोपळ्यापेक्षाही फायदेशीर आहेत त्याची साल, जाणून घ्या फायदे

 

८ तास झोप आणि संतुलित आहार घेऊन पण तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात वाढणाऱ्या रोगांची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला कामात लक्ष लागत नाही. जास्त थकवा जाणवतो. चिडचिड होते. अस होत असल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

गंभीर आजाराचे लक्षणे –

थकवा हे मधुमेहाचे लक्षणे आहेत. जर तुम्हाला जास्त थकवा येत असेल तर तुम्ही लगेच सुगर टेस्ट केली पाहिजे. तसेच मधुमेह हा आता सामान्य आजार झाला आहे. शरीरात रक्ताची पातळी वाढली तर मधुमेह हा आजार होतो. त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात थकवा जाणतो.

 

शरीरात आयर्नची कमतरता असल्याने आपल्याला अशक्तपणा जाणवतो. लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे एका प्रकारचे प्रथिने आहेत, जे फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेते. शरीरात लोह नसणे ,सारखा सारखा थकवा येणे , उभे राहिले की चक्कर येणे , डोकेदुखी होणे अशी लक्षणे असू शकतात.

थायरॉईडची समस्या आजकाल खूप वाढताना दिसत आहे. थायरॉईड म्हणजे लहान आकाराची ग्रंथी आहे जी तुमच्या गळ्यात असते. थायरॉईड असल्यास तुम्हाला जास्त थकवा जाणवतो. कारण त्याची पेशी नीट काम करत नाही.

तुम्ही जास्त चिंतेत असाल तर तुम्हाला ब्लेडप्रेशर हाय ही समस्या होऊ शकते त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. यामुळे ही तुम्हाला थकवा जाणू शकतो.

हे ही वाचा :

दातदुखी पासून सुटका हवी आहे ?तर करा हे घरगुती उपाय

Exit mobile version