तुळशीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

तुळशीची पूजा केली जाते.

तुळशीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

तुळशीची पूजा केली जाते. घरासमोर जागेची समस्या असेल तर तुम्ही एका कुंडीत तुळशीचे रोपटे लावू शकता. तशी तुळशी आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. तुळशीपासून बरेच आजार ठीक होतात. तुळशीमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. रोज सकाळी तुळशीचे पाने खाली पाहिजे. तुळशीचे पाने खाल्याने पोट साफ होते आणि पोटातील विकार सुद्धा कमी होतात. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे. ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते. तसेच तुळशीचे काही प्रकार सुद्धा आहे.

हे ही वाचा : यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळे?

 

तुळशीचे फायदे –

रोज रात्री दुधात तुळशीचे पाने टाकल्यास आणि ते पिल्यास शरीरातील ताणतणाव कमी होतो.

सकळी उपाशीपोटी कोमट पाण्यासोबत तुळशीचे २-३ पाने खाल्यास पोटातील विकार कमी होण्यास मदत होते.

दिवसातून एकदातरी तुळशीचे पाने खाल्याने किंवा तुळशीचा पानांचा चहा करून पिल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आणि आपण कोणत्याही आजाराचा सामना करू शकतो.

दिवसभर कामाच्या थकव्याने आपण कंटाळून जातो. त्यामुळे आपली चिडचिड होते आणि आपले कुठेही लक्ष लागत नाही. त्यासाठी दिवसभरात एकदातरी तुळशीचा काडा पियाला पाहिजे. तुळशीचा काडा पिल्याने आपणास फ्रेश वाटते आणि दिवसभरचा थकवा सुद्धा निघून जातो.

 

तुळशीच्या बियांचा वापर रोजच्या आहारामध्ये केल्यास हृदयाचा ताण कमी होतो. आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

ऋतू बदल्यानंतर अनेकांना सर्दी खोकला होतो. अशावेळी तुळशीच्या काढ्यासारखा घरगुती उपाय केल्यास नक्कीच आराम मिळतो.

लिंबाच्या रसात तुळशीचे पाने मिक्सकरून लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो.

तुळशीसोबत काळीमिरीचं सेवन केल्यास पचन चांगलं होतं.

जखम झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास जखम लवकर भरते आणि इन्फेक्शनही होत नाही.

हे ही वाचा :

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

 

Exit mobile version