या अनवट चवीच्या पावसाळ्या भाज्या तुम्हाला माहित आहे का? या भाज्यांपासून सूप आणि लोणच्यापर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील

या अनवट चवीच्या पावसाळ्या भाज्या तुम्हाला माहित आहे का? या भाज्यांपासून सूप आणि लोणच्यापर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील

गुजराती आणि सिंधी घरांमध्ये पावसाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली जाणारी कमळकाकडी भाजी अगदी वेगळ्या चवीची असून भारतातल्या अशाच अनवट प्रकारच्या भाज्या आहेत.

पावसाळ्यातील भाज्या: पावसाळ्यात मेथी, पालक अशा बारमाही मिळणाऱ्या भाज्या असतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रकारच्या अनवट चवीच्या भाज्या आहेत. ज्यांच्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ केले जातात. काही भाज्या अत्यंत औषधी समजल्या जाणाऱ्या आणि अनेक गुणधर्म असणाऱ्या या भाज्यांपासून लोणचे ते सूपपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ केले जातात.

बाबूंच्या कोबांची भाजी: आजकाल बाबूंच्या लागवडीला राज्यामध्ये प्रोत्साहन दिले जात आहे. बाबूंच्या कोवळ्या कोंबापासून बनवली जाणारी चवीला अगदी वेगळी पण पौष्टिक भाजी कोकणामध्ये बनवली जाते. या चविष्ट भाजीसाठी करावे लागणारे सोपस्कारही बरेच काही आहे. कोवळ्या बांबूला सोलून, त्याला चिरून तो आठ-दहा तास पाण्यात भिजवून त्यामधील त्याचा उग्रपणा कमी करावा लागतो. त्यानंतर त्याच्या कापापासून ही बांबूची भाजी बनवली जाते. बांबूच्या कंदाचे बारीक तुकडे करून त्याचं सूपही केलं जात. ज्यात अनेक चविष्ट आणि शरीराला हायड्रेट आणि उष्ण ठेवणारे गुणधर्म असल्याचं सांगितलं जात आहे.

राजगिऱ्याच्या पानांची भाजी: लालसर हिरवे पानं असणारा राजगिरा पावसाळ्यात बाजारामध्येही सहज उपलब्ध होतो. नेहमीच्या पालेभाज्यांसारख्या ही पानं दिसत असले तरी या भाजीची चव चांगली असते. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये ही भाजी भरपूर दिसते.या भाजीला हिंदीमध्ये चक्क बेशरम असं नाव आहे.

ओव्याच्या पानांची भाजी: ओव्याची पानं पचनाला उपयुक्त असून त्याच्या सुगंधासाठीही ओळखली जाते.

शतावरीची भाजी: आरोग्याला फायद्याची असणारी शतवरी नाव ऐकलं तर कुठल्यातरी आयुर्वेदिक दुकानांमधील गोष्ट वाटत असलं तरी शतावरीची भाजी अनेकजण करतात. हिरव्या रंगाच्या असलेल्या या शतावरीच्या पानाचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहे. या शतावरीचे खाण्याचे आणि शोभेचे असे दोन प्रकारची पानं मिळतात. पण यामधील खाण्यायोग्य शतावरीची भाजी अगदी दुर्मिळ आहे.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; Navneet Rana यांना अश्रू अनावर

काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Exit mobile version